पुढील ३ ते ४ दिवस महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई – गेल्या काही आठवड्यांपासून गायब असलेला मान्सून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. छत्तीसगढ मध्ये निर्माण झालेल्या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन ते चार महाराष्ट्रात दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात आज ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक मध्ये ऑरेंज अलर्ट

नाशिकसाठी मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर लातूर आणि उस्मानाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

जळगाव मध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर : अनेक घरात शिरले पाणी

जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत.चाळीसगाव सह औरंगाबादेतील कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. तर कन्नड चाळीसगाव घाटात कोसळली दरड. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील १० ते १२ गावांचा तुटला संपर्क

बीड मध्ये जोरदार पाऊस : कुंडलिका नदीला पूर
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील तुडुंब भरून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता व्यक्त करण्यात येत नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.