आजचे राशिभविष्य शनिवार, १३ एप्रिल २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल पंचमी. वसंत ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९ ते १०.३०
“आज चांगला दिवस आहे” *सूर्याचा मेष राशीत प्रवेश*
चंद्र नक्षत्र – मृग.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृषभ/ १२:४४ नंतर मिथून.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र खर्च वाढतील. कामाचा तणाव जाणवेल. दुपारनंतर उत्साही ,आनंदी काळ.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सकाळची सुरवात मस्त असेल.मानसन्मान चे योग.कामात सुयश मिळेल.मेजवानी चा लाभ घ्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे.पूर्वार्ध काहीसा संथ राहील.कामाच्या ठिकाणी मोजके बोला.परदेशी जाऊ इच्छुकांना सुसंधी मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सकाळचे सत्र उत्साही असेल.संभाषण कौशल्य कामास येईल.आवडत्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील.संध्याकाळ विश्रांती ची.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कागदपत्रे सावधतेने हाताळा. सामाजिक कामात सहभाग घ्याल.मेहनतीच्या मानाने यश कमी लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे.प्रवासाचे योग.कामाचे कौतुक होईल. धार्मिक समारंभात सहभाग घ्याल.आरोग्य जपा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. मोजके बोला .धार्मिक सहली घडतील.अहंकार टाळा.महत्वाची कामे पुढे ढकला.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गोड बोलण्यातून फायदे होतील.भागीदारी व्यवसायात लाभ होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारी व्यवसायात करताना सावधतेने कामे करा.आर्थिक दृष्टीने चांगला. शत्रूंचा नाश होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संतती कडून आनंद देणारा दिवस आहे.लेखनातून लाभ होतील.विद्यार्थ्यांना सुयश मिळेल.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल.कामे मार्गी लागतील. प्रवासातून लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवास कार्यसाधक ठरतील.बौद्धिक क्षेत्रात प्रगति कारक.आरोग्यासाठी खर्च होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!