आजचे राशिभविष्य मंगळवार,१६ एप्रिल २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.
चैत्र शुक्ल अष्टमी.वसंत ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस आहे” *दुर्गाष्टमी* 
नक्षत्र – पुष्य. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. प्रवासाचे योग आहेत. गृहकामात वेळ जाईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. मनासारखा खर्च कराल. मौल्यवान वस्तू खरेदी होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. स्वप्ने साकार होतील. धन स्थानातील चंद्र उत्साह वाढवेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. तुम्हाला मुळात चांविष्ठ भोजनाची आवड आहे. आज मेजवानी मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढतील. अचूक अंदाज कराल. येणाऱ्या काळासाठी नियोजन करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. उत्साह वाढेल. नवीन मित्र भेटतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.मन लावून व्यवसाय कराल. नफा वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जेष्ठ व्यक्तीची सेवा कराल.आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नैतिक मार्गाने फायदा मिळवण्यात काहीच गैर नाही. आर्थिक येणी वसूल होतील. मात्र धोपट मार्ग सोडू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गृहलक्ष्मी ची काळजी घ्या.उत्तम साथ लाभेल.राजकीय वर्तुळात अद्याप वाट बघावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अर्थकारण मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.उष्णतेचे विकार संभवतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पूर्वजांची पुण्याई कामास येईल.जेष्ठची मदत मिळेल.संतती साठी वेळ द्यावा लागेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!