पुण्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले

0

पुणे,दि,२४ ऑगस्ट २०२४ – मुंबईवरून हैदराबादला निघालेल्या हेलिकॉप्टरचा पुण्याजवळ (Helicopter Accident in Pune) मोठा अपघात झाला.मुंबईतील जहू एअरबेस वरून AW 139 हे हेलिकॉप्टर हैदराबादकडे जाण्यासाठी निघाले होते. परंतु आज दुपारी २.३० वाजता पुण्यातील पौड गावात हे हेलिकॉप्टर कोसळले पुण्यात सकाळपासून वातावरण खराब असल्यामुळे दृश्यता कमी झाली. त्यामुळे मुंबईवरून निघालेले हेलिकॉप्टर पुण्याजवळ भरकटले. ते एका झाडावर आदळले आणि खाली पडले. पौड रोडपासून दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. त्यातील एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतरांना प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले. दरम्यान, हेलिकॉप्टर कोसळत असल्याचे दृश्य स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये बंदीस्त केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुण्यात सकाळपासून वातावरण खराब असल्यामुळे दृश्यता कमी झाली. हे हेलिकॉप्टर पुण्याजवळ भरकटले. ते एका झाडावर आदळले आणि खाली पडले. पौड रोडपासून दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. मोकळ्या मैदानावर हे हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गावात हे हेलिकॉप्टर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस. पी. राम होते. त्यातील दोघे पायलट तर दोन अभियंता आहे. कॅप्टन आनंद यांना रुग्णायलयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आले नाही.

 

https://x.com/jitendrazavar/status/1827305425273753628

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.