कोकण,मध्य महाराष्ट्रासह विदर्भात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस

0

मुंबई,दि,२७ ऑगस्ट २०२४ –राज्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.नाशिक सह अनेक जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून संततधार सुरु आहे. यंदाच्या मोसमात गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आला असून गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधारेमुळे हा पूर ओसरत नाही आहे.मराठवाडयाचा काही भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर शुक्रवारपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील घाटमाथा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार या प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे.सध्या दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ वित्तारण्टीपर्यंत निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे पावसाने जोर धरला आहे.

कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस पडेल; तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडणार आहे.दरम्यान, गेल्या २३ तासांत मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार, कोकणात अतिजोरदार तर मराठवाड्यात तुरळक पावसाने हजेरी लावली.

यलो अलर्ट
पालघर, ठाणे, नाशिक: २७ ऑगस्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड ३०. पुणे (घाटमाथा): २९, ३०. कोल्हापूर: २७ ते ३०. परभणी, हिंगोली, नांदेड २९. अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्षा, वाशिम, यवतमाळ, रायगड : २८ ते ३०.

ऑरेंज अलर्ट
रायगड, सातारा २७. पुणे (घाट) २७, २८.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.