मुंबई,दि,२७ ऑगस्ट २०२४ –‘बिग बॉस मराठी’च्या घरात महिन्याभरातच नात्यांची चक्र फिरली आहेत. कालच्या भागात बिग बॉसने घरतील सदस्यांना जोंड्यांच्या बेडीत अडकवलं असून निक्की आणि अभिजीतची एक जोडी आहे. आता या जोडीमुळे निक्की आणि अभिजीतची मैत्री मुळेल का? असा प्रश्न बिग बॉसप्रेमींना पडला आहे.निक्की आणि अभिजीतची दिल दोस्ती दुनियादारी अरबाजला मात्र खूप खटकत आहे.
बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत पोळी बनवताना दिसत आहे. दरम्यान निक्की हसल्यामुळे अरबाज तिला “हसत आहेस”, असं म्हणत भांडी फोडतो. त्यावर निक्की म्हणते,”काय आहे याचा बालीशपणा. तुला माझी गरज नाही आहे”.यावर अरबाज म्हणतो,”नाही आहे…आता हे पाहून तर अजिबातच नाही”. अरबाजला उत्तर देत निक्की म्हणते,”हे असं स्पष्ट बोलायचं माझ्यासोबत”.
निक्की आणि अभिजीतची मैत्री पाहणं अरबाजला सहन होत नाही. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो दुखावला आहे. भांडी फोडून, सामान आपटून तो कल्ला करताना आजच्या भागात दिसून येईल. संतापलेल्या अरबाजला घरातील इतर सदस्य शांत करताना दिसून येतील.
आपण जे करतो तेच आपल्याला मिळते..”पॅडी दादांचा अभिजितला टोला
बिग बॉसच्या घरातमध्ये सदस्यांमधील प्रत्यके आठवड्याला काय प्रत्येक दिवशी बदलताना दिसत आहेत. निक्की आणि जान्हवीची ३० दिवसांची मैत्री एका दिवसात संपली. तर, दुसरीकडे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीमध्ये देखील अभिजीतमुळे दुरावा आला आहे. निक्की आणि अभिजीतची जोडी आता घरात कोणता नवीन कल्ला करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. प्रत्येक सदस्याच्या डोक्यात वेगळीच प्लनिंग सुरु असल्याचे दिसत आहे. निक्की टीम ‘बी’ मधल्या पॅडी दादा, अभिजित आणि सुरज यांच्या सोबत बोलताना दिसत आहे.
आज घरामध्ये पॅडी दादा अभिजीतला म्हणत आहेत की ,” तुझ्यावर जर अरबाजसारखी वेळ आली तर कॅप्टनसी दुसऱ्याला द्याची तर ती तू मला दे..”त्यावर निक्की हसून म्हणते की ,”आता तर मी हक्काने म्हणू शकते की, तू माझा विचार कर.यासगळ्या वर अभिजित पॅडी दादांना म्हणतो की ,” मला तुमच्या सगळ्यांबद्दल मनात खूप प्रेम आहे. पण तुम्ही आता तसे नाही राहिलात. एखाद्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्याचा असेल तर तुम्ही तो दिला आहे. तुम्ही निक्कीला देखील त्रास देत आहेत. आमच्या दोघानांपण टार्गेट केले जात आहे. त्यावर पॅडी दादा म्हणत आहे ,”आपण जे वागलो आहे तेच आपल्याला परत मिळत असते आणि आम्ही त्रास नाही देत गमंतीच करत आहोत जसे तू करायचास.”