ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण पंचमी. शरद ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज (कृतिका) वर्ज्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – कृतिका(सूर्य).
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. सन्मान मिळतील. अनपेक्षित लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. स्तुती घडेल. अगदी वेगळा विचार कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. शेतीतून लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. अधिकार वाढतील.
सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. मोठ्या जबाबदाऱ्या पार पडाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील मात्र खर्च सुद्धा वाढेल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. उधार देणे टाळा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. जुनी मित्र मंडळी भेटतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक यश मिळेल. हरवलेली वस्तू सापडेल. मेजवानी मिळेल. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कला प्रांतात उत्तम यश लाभेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील. आनंद देणाऱ्या घटना घडतील.
कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. बाग बगीचा शी संबंध येईन. प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. कलाकारांना यश मिळेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)