पुणे,दि,२ ऑक्टोबर २०२४ – पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.पुण्यातील बावधन बुद्रुक येथे आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते.सदर भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते.अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले. हेलिकॉप्टर कोसल्यानंतर त्यानी पेट घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बावधनजवळ हा अपघात झाला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केले.
Maharashtra: 3 dead after helicopter crashes near Bavdhan area in Pune
Read @ANI story | https://t.co/VZaISoohJX
#HelicopterCrash #Pune #Maharashtra pic.twitter.com/ewPoU5AGir— ANI Digital (@ani_digital) October 2, 2024
मुळशीचा हा सगळा परिसर डोंगराळ आहे. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर धुके आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला असावा आणि हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवविला जात आहे.दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचे हेलिकॉप्टर आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेऊन मुंबईतून उडणार होते, अशी माहिती समोर आली.
काही दिवसांपूर्वी मुळशी भागातही एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. आणि आज पुन्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानं सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
#WATCH | Pune (Maharashtra) helicopter crash | Chief Fire Officer Devendra Prabhakar Potphode says, “…We got the information that there is a chopper crash very close to Oxford helipad. Our fire teams from the nearest fire stations responded…We also summoned PMRDA fire… pic.twitter.com/4ApOZ2Vutm
— ANI (@ANI) October 2, 2024
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा