दिपावलीचे शुभ मुहूर्त
गुरूवार दिनांक ३१/१०/२०२४ रोजी नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंग स्नान सकाळी ६:०० पुर्वी करणे. चंद्रोदय पहाटे ५ः२७ मि. दिपदान यमतर्पन, कुलधर्म आणि कुलाचार करणेशुक्रवार दि. ०१/११/२०२४ रोजीचे श्री लक्ष्मी कुबेर पुजन मुहूर्त शुक्रवार पहाटे ३:४५ ते ५:१५ शुभ, पहाटे ५:१५ ते ६:४५ अमृत, सकाळी ८:१५ ते ९:४५ लाभ, ९:४५ ते १०:३५ अमृत, दुपारी १२:००ते १ः३० शुभ, सायं. ५ः१५ ते ६ः४५ शुभ-चंचल, ६:४५ ते ८:१५ लाभ चंचल (रो. अमृत), रात्री ९:४५ ते ११:१५ लाभ, सिंह लग्ना वरील लक्ष्मी पुजन मध्यरात्री ०१:०९ ते ०३:१५ मि.
अश्विन कृष्ण चतुर्दशी. शरद ऋतू.दक्षिणायन.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.१० ते ४.२६
“आज आनंदी दिवस आहे” अभ्यंगस्नान ,*नरक चतुर्दशी,(सूर्योदय ६.३८)
अमावस्या प्रारंभ दुपारी ३.५२
चंद्र नक्षत्र – चित्रा
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक जोखीम घेऊ नका. अधार्मिक कृत्ये हातून घडणार नाहीत याची काळजी घ्या. सरकारी नियमांचे पालन करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली होणार आहे. मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात खर्च कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. अनुकूलता लाभलेली आहे. संतती कडून खुश खबर मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरगुती कामात व्याकगर व्हाल. सणाचा आनंद घ्याल. आप्तेष्ट भेटतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना उत्तम यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कौटुंबिक सौख्यचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात खर्च कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्या राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळणार आहे. आनंदी राहाल. पत्नीशी मतभेद टाळा.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रतिकूल ग्रहमान आहे. विनाकारण मनस्ताप करून घेऊ नका. खर्च वाढणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. सणाचा आनंद घ्याल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक एखादे काम निघू शकते. मनाची तयारी ठेवा. आर्थिक नियोजन करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवीन माहिती आणि ज्ञान मिळण्यासाठी चांगला दिवस आहे. अभ्यासू वृत्तीचा फायदा होईल. छोटे प्रवास घडतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रतिकूल दिवस आहे. कौटुंबिक मतभेद संभवतात. संयमाने परिस्थिती हाताळा.