अश्विन कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. शरद ऋतू, दक्षिणायन.
राहुकाळ – सकाळी ९.२७ ते सकाळी १०.५२
“आज वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र: हस्त
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र अनुकूल होत आहे. दीर्घकालीन नफा होईल. मात्र शत्रू त्रास जाणवेल. माघार घ्यावी लागेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक स्थिती सुधारेल मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन जपून चालवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे प्रवास संभवतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध चांगला आहे. कामे पूर्ण करा. नात्यात वाद टाळा. नोकरीच्या जागी संयम बाळगा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तरार्ध अनुकूल आहे. स्पर्धेत बाजी माराल. कोर्ट कामात यश लाभेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. दबदबा वाढेल. अधिकाराचा योग्य वापर करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पूर्वार्धात कामे पूर्ण करा. अग्नी पासून सावध रहा. उत्तरार्ध विश्रांतीचा आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मागील प्रमाणे कामे चालू ठेवा. नवीन करार नकोत. संमिश्र कालावधी आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. मात्र व्यवसायात काही अप्रिय प्रसंग घडू शकतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही. सुरुवात संथ होणार आहे. उत्तरार्धात कामे मार्गी लागतील. प्रवास टाळणे हिताचे आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाचा पूर्वार्ध शुभ आहे. आर्थिक आवक वाढेल. उत्तरार्ध संथपणे व्यतीत होईल. अति धाडस नको.