आजचे राशिभविष्य शनिवार, २३ मे २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today Horoscope in Marathi)
अधिक ज्येष्ठ अष्टमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे.”
🌙 नक्षत्र – मघा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह. (ध्रुव आणि व्याघात योग, दुपारी ४.४१ पर्यंत विष्टी करण अशुभ)
🔭 रवी केंद्र चंद्र.
🔭 चंद्र त्रिकोण मंगळ.
🔭 चंद्र लाभ शुक्र.
🔭 चंद्र केंद्र हर्षल.

🪔 राशिभविष्य (Today Horoscope in Marathi)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पंचम स्थानी चंद्र आहे. तुमचा धाडसी स्वभाव आज अधिक प्रभावी ठरेल. संतती संबंधित आनंददायक बातमी मिळू शकते. संध्याकाळनंतर ग्रहमान अधिक अनुकूल होईल. प्रेमसंबंधात यश लाभेल. आर्थिक बाबतीत संयम ठेवावा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरणात काही बदल घडतील. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चर्चा होऊ शकते. शनीची अनुकूलता तुमची कामे मार्गी लावेल. मात्र भावनिक निर्णय घेणे टाळा. संध्याकाळनंतर मानसिक समाधान लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) उद्योग आणि व्यवसायात वेळ जाईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरुवातीला मन लागणार नाही. महिलांकडून अपेक्षित सहकार्य कमी मिळेल. मात्र संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कल्पना लाभदायक ठरतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) द्वितीय चंद्र आहे. कौटुंबिक वातावरणात काही तणाव जाणवू शकतो. मात्र धार्मिक उपासना आणि शांत स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. आर्थिक लाभ होतील. बोलण्यात संयम ठेवणे आवश्यक आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह वाढेल. आज तुम्ही काही नवीन योजना किंवा घोषणा कराल. रवी केंद्र चंद्र योगामुळे प्रतिष्ठा वाढेल. मात्र सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद कमी मिळेल. संध्याकाळनंतर ग्रहमान अनुकूल होईल.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आज फारशी अनुकूलता नसली तरी संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. खर्च वाढतील. कठोर बोलणे टाळा. महिलांकडून टोमणे सहन करावे लागू शकतात. चंद्र लाभ शुक्र योगामुळे कला आणि सौंदर्य क्षेत्रात लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्राची अनुकूलता आहे. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मानसिक तणाव टाळा. जलप्रवास टाळावा. संध्याकाळी आनंददायक घटना घडतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) दशम स्थानी चंद्र आहे. कामातील सातत्य ठेवावे लागेल. फळाची अपेक्षा न करता प्रयत्न करत राहा. मंगळाच्या त्रिकोण योगामुळे धैर्य वाढेल. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सावध राहा. वरिष्ठांसोबत मतभेद टाळावेत.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्यस्थानी चंद्र आहे. भाग्याची साथ लाभेल पण प्रगती सावकाश होईल. वाहन दुरुस्ती किंवा खर्च संभवतो. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. संध्याकाळनंतर प्रवास किंवा धार्मिक कार्यातून लाभ मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वाद संभवतात. पत्नीकडून किंवा महिलांकडून मदत मिळेल. मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात गैरसमज होऊ शकतात. मंगळ आणि हर्षलमुळे चिडचिड वाढू शकते. श्री. गणेश आणि श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. पाण्याजवळ जाणे टाळा.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) षष्ठ स्थानी चंद्र आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज कोणतेही मोठे साहस करू नका. शत्रूपासून सावध राहा. मात्र संध्याकाळनंतर कामातील अडथळे कमी होतील. श्री. गणेश उपासना केल्यास मानसिक समाधान लाभेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!