वृद्ध जोडप्याच्या जीवनाचे हृदयस्पर्शी नाट्य दाखवणारे नाटक “संध्याछाया”
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेला नाशिक मध्ये जल्लोषात प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अंबिका चौक सेवाभावी संस्था प्रस्तुत जयवंत दळवी लिखित ‘संध्याछाया’ नाटक सादर झाले. सुरेखा लहामगे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात मुले मोठे झाल्यानंतर मुले-सुना नातवंडे याच्यासोबत आयुष्य सुखात घालवण्याचे स्वप्न पाहण्याऱ्या वृद्ध जोडप्याची कहाणी मांडण्यात आली. विदेशात गेलेला मुलगा तिथेच विवाह करून स्थायिक होतो, तर दुसऱ्याला युद्धात हौतात्म्य येते. त्यानंतर आयुष्याच्या सांजवेळी वृद्धांची होणारी आबाळ आणि ते वृद्ध जोडपे मृत्यूला कवटाळतात. वृद्धांनी संपवलेली जीवनयात्रा अशा करुणरसात प्रेक्षक अंतर्मुख होतात. नाटकातील मुख्य पात्र नाना व नानी हे संदीप कोते व रेवती यांनी आपल्या अभिनयाने लीलया पेलले. रेवती अय्यर या कलावंत अमराठी भाषिक असूनही मराठी भाषेवर उत्तम पकड ठेवून नाटक आपल्या अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेले.
एखाद्या परिवारातील एखादं मुलं नोकरीनिमित्त दुसर्या शहरात वा देशात असेल, तर त्याची काळजी आणि विशेष म्हणजे तो परतण्याची ओढ ही असतेच. हीच ओढ आणि त्याच्याकडून आई-वडिलांना असणार्या आशा-आकांक्षा अपूर्ण राहतात आणि त्या विखुरलेल्या कुटुंबाचे काय होते याचे चित्रण ‘संध्याछाया’ या नाटकातून उत्कृष्ट सादर झाले. दिग्दर्शकाने अगदी नेपथ्यापासून वेशभूषेपर्यंत मेहनत घेतल्याचे दिसून आले. नाटकामध्ये सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाने नाटक एका वेगळ्या उंचीवर नेले.
१९७० मध्ये लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेले आणि १९७६ मध्ये प्रथम रंगमंचावर आलेले ‘संध्याछाया’ हे नाटक त्या काळात खुप गाजले होते. एका दांपत्याचा एक मुलगा लष्करात, तर दुसरा मुलगा परदेशी नोकरीला असतो. परदेशातील मुलगा आई-वडिलांना न सांगता लग्न करतो, आठ-दहा वर्षे परत येत नाही. परततो पण केवळ भेटायला, तर दुसर्या मुलाचा मृत्यू होतो. अशी काहीशी या नाटकाची कथा. या नाटकाची कथा जुनीच असली, तरी त्यात नाना-नानीच्या भूमिकेत संदीप कोते आणि रेवती अय्यर यांनी आपल्या चोख अभिनयाने सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
पूर्वी संध्याछाया नाटकामध्ये नाना नानी ची भूमिका साकारणारे नाशिकचे ज्येष्ठ कलाकार सदानंद जोशी आणि हेमा जोशी हेही नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात उपस्थित होते. प्रयोग झाल्यानंतर त्यांनी नाना नानी ची भूमिका करणाऱ्या संदीप कोते आणि रेवती अय्यर यांचे कौतुक केले. नाटकाचे दिग्दर्शक सुरेखा लाहामगे यांचे होते. नेपथ्य प्रवीण राशिनकर व संगीत संयोजन शुभम शर्मा यांचे होते. प्रकाश योजना विनोद राठोड व रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकातील मुख्य पात्र नाना व नाणी हे संदीप कोते व रेवती यांनी आपल्या अभिनयाने लीलया पेलले. त्यांच्यासह अमोल थोरात सुमंत महाजन करण गायकवाड भरत सिंग परदेशी प्रवीण राशिनकर अविराज बाबर दृष्टी सनांसे यांनी सहकालाकाराची भूमिका आपल्या अभिनयाने योग्य साथ देत नाटकामध्ये रंगत आणली.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३