गुलामगिरीतून मुक्त करून समानतेची भावना निर्माण करणारे नाटक “द थर्टीन्थ अमेंडमेंट” .

६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र

0

६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १० डिसेंबर रोजी मायको एम्प्लॉईज फोरम,नाशिक संघातर्फे द थर्टीन्थ अमेंडमेंट हे नाटक सादर करण्यात आले. आज महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये फार वर्षांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी कृष्णवर्गीय लोकांविरुद्ध चालणारी गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. ती मोडीत काढण्यासाठी व लोकांनी, लोकांसाठी लोकांचं चालवलेल राज्य शाबूत राहण्यासाठी त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गृहयुद्ध परिस्थितीतही सर्वतोपरी संघर्ष करून, कायद्यामध्ये तरतुदी करून म्हणजे द थर्टीन्थ अमेंडमेंट हा कायदा पास करून सर्व कृष्णवर्णीय लोकांना गुलामगिरीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण करण्याचे महान कार्य केले. अशा या हृदयद्रावक सत्याचे वर्णन द थर्टीन्थ अमेंडमेंट या नाटकात केले आहे.

नाटकाचे लेखन डॉ. समीर मोने यांनी तर दिग्दर्शन सचिन रहाणे यांनी केल. नेपथ्य दिगेन वाघ व प्रकाश योजना कृतार्थ कंसारा यांची होती. संगीत प्रणिल तिवडे, वेशभूषा माही वाघ व रंगभूषा ललित कुलकर्णी यांची होती. नाटकामध्ये अब्राहम लिंकन – सचिन रहाणे, मेरी – केतकी कुलकर्णी, निकोलस – नकुल चौधरी, कोलंबस – लव पाटील, टॉय – आर्यन बोळीज, पोप – कौस्तुभ पांडे, सेवॉर्ड – नितीन साळुंखे, ब्लेअर – सम्राट सौंदरकर, व्यक्ती – अनुराग पाटील, स्लेड – स्वप्नील वानखेडे, शेतमजूर – निलेश जगदाळे, शेतमजूर – दिगेन वाघ, केकली – निकिता लोंढे, अमेरिकन स्त्री – माही वाघ यांनी नाटकात भूमिका साकारल्या.

दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३

आजचे नाटक – विनाशकाले,
संस्था – इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक
लेखक – डॉ. राजीव पाठक
दिग्दर्शक – मुकुंद कुलकर्णी,

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.