६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १३ डिसेंबर रोजी एच ए इ डब्ल्यू आर सी रंगशाखा, ओझर या संघाचे अकल्पित हे नाटक सादर करण्यात आले. मुंबईतील एक पावसाळी रात्र. पावसाने सगळीकडे हाहाकार माजलेला असताना, शहरात तीन खून होतात. एक राजकारण्याचा मुलगा, एक उद्योगपतीचा मुलगा आणि नेत्याचा मुलगा. ही केस एका तरुण इन्स्पेक्टर कडे येते. बाहेर मुसळधार पाऊस आणि बाकी सर्व पोलीस लोकांना वाचवण्यात अडकलेले असताना, हा इन्स्पेक्टर त्याचा एक ज्येष्ठ हवालदार, त्यांचा खबरी आणि योगायोगाने पोलीस स्टेशनमध्ये आलेला बडबड्या पत्रकार या अशा वेगळ्याच लोकांची टीम बनून केस कशी सोडवतात. त्याची ही रहस्यमय कथा आणि तेवढाच त्या कथेचा अकल्पित शेवट या नाटकात दाखवण्यात आलेला आहे.
नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मिलिंद मेधने यांचे होते. रंगभूषा दत्ता जाधव तर नेपथ्य हेमंत सराफ यांचे होते. संगीत विकास शिंदे व प्रकाशयोजना जयदीप पवार यांचे होते. नाटकामध्ये मिलिंद मेधने – इन्स्पेक्टर, योगेश बागुल – हवालदार, शंकर वाघमारे – चोर, प्रवीण मोकाशी – पत्रकार यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – मी आणि माझी कला
संस्था – हं. प्रा. ठा.कला व रा.म. क्ष.विज्ञान महाविद्यालय,नाशिक
लेखक – तुषार गुरूम,
दिग्दर्शक :- सोनाली गायकवाड -कुलकर्णी,