वास्तविक जीवन आणि फॅन्टसी वर आधारीत नाटक “स्पायडरमॅन”
६३ वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १६ डिसेंबर रोजी दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग संघातर्फे स्पायडरमॅन हे नाटक सादर करण्यात आले. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचे वास्तविक जीवन आणि त्याच्या मनातल्या इच्छा, फॅन्टसी ह्यांचं द्वंद नेहमीच चालू असत,कधी कधी अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं की तिथे आपण जगत असलेल जीवन महत्त्वाचे की आपल्या मनातल्या आपल्या फॅन्टसी यांच्यामध्ये अडकला होतं आणि तेव्हाच सुरू होतो हा खेळ.
या मनाच्या आणि वास्तवाच्या खेळात कधी वास्तव आपल्याला भयाण करतं किंवा कधी फॅन्टसी आपल्या मनावर आपल्यावर राज्य गाजवते. अशीच कथा घडते ती वास्तववादी सिनेमांचा लेखक नितीन, त्याची बायको आणि मोठी अभिनेत्री होण्याची स्वप्न घेऊन जगणारी योगिता आणि त्यांचा जगण्यासाठी धडपड करणारा मुलगा पियुष यांच्या आयुष्यात. नितीन हा नेहमी वास्तवात जगणारा, मनाच्या भावनांपेक्षा बाहेरच्या दुनियेत काय चाललंय हे जास्त महत्त्वाच मानणारा, तरी पण योगिताशी प्रेम विवाह करून राहणारा. आजच्या रोमँटिक, ॲक्शन, कमर्शियल सिनेमापेक्षा जगाचा दुःख आणि सत्य सांगणाऱ्या सिनेमाला महत्व देणारा. योगिता ही त्याच्या एका फिल्मच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून आलेली स्त्री. प्रेमविवाह करूनही आयुष्यभर प्रेम शोधणारी. आपल वय ओलांडून गेलं तरी मनासारखा प्रियकर शोधणारी आणि अजूनही तरुण हिरोईन च्या भूमिका स्वतःला पाहणारी, आणि या दोघांच्या स्वभावामुळे आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हेच माहीत नसलेला त्यांच्या मुलगा पियुष. या तिघांच्या आयुष्यात काय असं घडत की त्यांचं जीवन बदलून जातं हे सांगणार नाटक म्हणजे स्पायडरमॅन.
नाटकाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांचे तर दिग्दर्शक अमित मुळे यांचे होते. नेपथ्य स्वरूप बागुल व संगीत मोहित तनपुरे यांचे होते. प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा तर रंगभूषा आणि वेशभूषा निकिता मुळे यांची होती. नाटकामध्ये नितीन – जय शुक्ल, योगिता – श्रिया जोशी, पियुष – अभिषेक गायकवाड, स्पायडरमॅन -कौस्तुभ एकबोटे यांनी भुमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक -ऐश्वर्या ब्युटी पार्लर
लेखक- विद्यासागर अध्यापक
दिग्दर्शक -आर्या प्रशांत हिरे,
संस्था – भडक दरवाजा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक