ब्युटी पार्लर मागच्या राजकारणावर प्रकाश टाकणारे नाटक “ऐश्वर्या ब्युटी पार्लर”
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १७ डिसेंबर रोजी भडक दरवाजा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नाशिक संघातर्फे ऐश्वर्या ब्युटी पार्लर हे नाटक सादर करण्यात आले. ब्युटी हा सुद्धा एक मोठा भ्रम आहे. सत्य कळायलाच नको यावर भाष्य करणारे नाटक म्हणजे ऐश्वर्या ब्युटी पार्लर. स्त्री म्हटली की दुःख आलेच. दुःख प्रत्येकालाच असते, फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. मग ते कुठल्याही धर्माचे असोत, त्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे ब्युटीपार्लर. ब्युटी पार्लर मागचे राजकारण,
पुरुषांची त्या मागची मानसिकता शिकलेली स्त्री घराबाहेर पडली की राजकारणात शिरेल अशी पुरुषांना वाटणारी भीती वगैरे यावर प्रकाश टाकणारे नाटक. या नाटकाद्वारे स्त्रीला आरशात कसे जखडून टाकले जाते यावर प्रकाश टाकला गेला आहे. ब्युटी पार्लर या व्यवसायात होणारे राजकारण, अगदी मोजक्या पण योग्य शब्दात लेखकाने मांडले आहे आणि कलाकारांनी ते प्रेक्षकांसमोर योग्यरित्या सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य लोकांना पार्लर या विषयावर नवीनच शिकवण देणारे आणि विचार करायला लावणारे नाटक म्हणजे ऐश्वर्या ब्युटी पार्लर.
नाटकाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांचे तर दिग्दर्शन आर्या प्रशांत हिरे यांचे होते. संगीत रोहित सरोदे तर प्रकाश योजना रवि राहणे यांची होती . रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा खुशी पवार आणि नेपथ्य वरूण भोईर यांचे होते. नाटकामध्ये कविता आहेर, आर्या प्रशांत हिरे, रुपाली भोळे, पायल साळवे, अनघा घोडपकर, माधवी खुशी, राजेंद्र पिंपळे, प्रकाश मुळे यांनी भुमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक -अंतः अस्ति प्रारंभः,
लेखक-आकाश कंकाळ
दिग्दर्शक -आरती प्रभु हिरे
संस्था – बाबाज् थिएटर्स, नाशिक,