गांधीनगर – गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज गांधीनगरमध्ये झाली या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने भूपेंद्र पटेल नेतेपदी निवडले गेले. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भूपेंद्र पटेल यांचे नाव सुचवले. त्यावर भाजप आमदारांनी एकमत दर्शवलं आणि पक्षानेही शिक्कामोर्तब केला आहे.
भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे मानले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्याची कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे