लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश

0

मुंबई – मागच्या महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. येत्या १६ सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.सुरेखा पुणेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा ही व्यक्त केली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरुन निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. आता या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.