आजचे राशिभविष्य गुरुवार, ३० एप्रिल २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
वैशाख शुक्ल चतुर्दशी / पौर्णिमा,वसंत ऋतू,पराभव नाम संवत्सर,शके १९४८, संवत २०८२
राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
“आज उत्तम दिवस आहे”
*श्री. नृसिंह जयंती*
चंद्र नक्षत्र – चित्रा
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या / (दुपारी १.१४ नंतर) तुळ
ग्रहयोग:
वज्र योग, चंद्र प्रतियुती बुध (Marathi Rashi Bhavishya)

♈ मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज बोलण्यात संयम ठेवा. चंद्र-बुध प्रतियुतीमुळे गैरसमज होऊ शकतात. कामात प्रगती होईल पण विचारपूर्वक निर्णय घ्या.

♉ वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवे कार्य सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

♊ मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
बुद्धिमत्तेचा उत्तम वापर कराल. नवीन कल्पना सुचतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

♋ कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मानसिक समाधान मिळेल.

♌ सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
पराक्रम वाढेल. कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.

♍ कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. व्यक्तिमत्व खुलून दिसेल.

♎ तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
दुपारनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल. भागीदारीत लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

♏ वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संमिश्र ग्रहमान आहे. वाद टाळा. संयमाने वागल्यास दिवस चांगला जाईल.

♐ धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
नवीन संधी मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल. भाग्याची साथ मिळेल.

♑ मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामात सातत्य आवश्यक आहे. खर्च वाढू शकतो. नियोजन करून काम करा.

♒ कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मित्रांचा सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना यशस्वी होतील.

♓ मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आज संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कामात बदल संभवतो.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!