पुणे,दि,७ एप्रिल २०२५ – गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी पुणे शहरा सह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने या समितीचा अहवाल आता समोर आला आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा अहवाल म्हंटले आहे.तब्बल साडेपास तास उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या शासनाच्या समितीचा अहवाल आला आहे. त्यात मृत्यूस दीनानाथ रुग्णालय जाबाबदार असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाने कोणतीही जबाबदारी पाळली नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात आला. साडेपाच तास गर्भवती महिला ही रुग्णालयातच होती. त्या तासाच रुग्णालयाने योग्य ते उपचार केले नाहीत. त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही. त्यामुळे रुग्णालयावर कायदेशीर कारवाई होणार असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान शासनाच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे, अशी माहिती देखील यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दरम्यान भिसे कुटुंबीयांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी एक लेखी पत्र देखील दिलं आहे. आज यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. यावेळी दीनानाथ रूग्णालयावरती ठपका ठेवण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रूग्णालय जबाबादार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.यावेळी त्यांनी रूग्णालयाने रूग्णाच्या खासगी माहिती अहवालातून दिल्याने चाकणकरांनी निषेध व्यक्त काल असून याबाबत त्यांनी दीनानाथ रूग्णालयाला समज देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजारा बाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. रुग्ण आणि नातेवाईक २८ मार्चला नऊ वाजता रुग्णालयात गेल्यावर दहा लाख रुपयांची मागणी केली. अडीच वाजता रुग्ण मंगेशकर रुग्णालयातून बाहेर पडला. साडेपाच तासात रूग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतीही उपचार केले नाहीत त्याउलट त्यांना त्यांच्याजवळ असलेली गोळी घेण्याचा सल्ला दिला होता. रूग्णांच्या नातेवाईकांचा दावा आहे की, मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचं सांगितलं. शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र, पैसे वेळेत भरु न शकल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झालं, रूग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक होतं, त्यांनी उपचार करणं गरजेचं होतं, पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबतचा अंतीम अहवाल माता मृत्यू अन्वेशन विभागाकडून आज संध्याकाळपर्यंत सादर होईल. तर आणखी एक अहवाल धर्मादायक विभागाकडून उद्या सादर होईल. या दोन्ही विभागांचे अहवाल आल्याशिवाय कारवाई करण्यात येणार नाही.उद्या तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहिल्यावर कारवाई काय करायचे हे ठरेल आहे अशी माहिती देखील यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.