नाशिक,दि,२५ एप्रिल २०२५ – नाशिकमधून एक मोठी बातमी येत आहे. नाशिक मधील दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात गवत कापण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय महाविद्यालयीन युवती वर बिबट्याने हल्ला केला असून केलेल्या हल्ल्यात या २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.पायल राजेंद्र चव्हाण ही तरुणी बिबट्या च्या मृत्युमुखी पडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापणेसाठी गेली असता बिबट्या ने तिच्यावर हल्ला केला नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्या ला पिटाळून लावले मात्र बिबट्या च्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वन विभागावर रोष व्यक्त केला. परिसरात सातत्याने बिबट्या चे दर्शन होत असते तसेच येथील जनावरांवर पण बिबट्याचे हल्ले होत आहे. काही महिन्यापूर्वी याच भागात गुराखी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार असलेल्या पायल च्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
[…] पाटील यांची नाशिक ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली […]