पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर जेलमध्ये लाँच! 

'पी.एस.आय. अर्जुन'चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

1

मुंबई, दि. ३ मे २०२५:- PSI Arjun Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एका ट्रेलर लाँच सोहळ्याने चांगलीच चर्चा गाजवली आहे. अंकुश चौधरी अभिनित ‘पी.एस.आय. अर्जुन’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर जेलच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस स्टेशनच्या रिक्रिएटेड सेटवर प्रदर्शित करण्यात आला. हा सोहळा इतक्या वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आल्याने चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी याची पोलिस वेशातील दमदार एंट्री, डायलॉग्स आणि अॅक्शनने भरलेला ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरमध्ये त्याचा पात्राचा रहस्यमय प्रवास दाखवला असून, तो चोर आहे की पोलीस, हे चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल यांचा हा मराठीतला पहिलाच चित्रपट असून,त्यांनी म्हटले की,“पी.एस.आय.अर्जुन (PSI Arjun Marathi Movie)हा थ्रिल, अॅक्शन, रोमान्स आणि रहस्यांनी भरलेला एक परिपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट आहे.”

चित्रपटाचे मुख्य कलाकार: अंकुश चौधरी, किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, अक्षया हिंदळकर.
दिग्दर्शक: भूषण पटेल
निर्माते: विक्रम शंकर, ध्रुव दास
बॅनर: व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमविव्हर एंटरटेनमेंट
प्रदर्शन दिनांक: ९ मे २०२५

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] पाटीलच्या ठसकेबाज अदांनी सजलेलं ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे आयटम साँग प्रेक्षकांच्या पसंतीस […]

Don`t copy text!