‘वामा’ चित्रपटातील गौतमी पाटीलचं जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित

गौतमी पाटीलचा 'फायर ब्रिगेडला बोलवा' आयटम साँग इंटरनेटवर हिट

0

मुंबई, ८ मे २०२५ – Gautami Patil item song ‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटातील गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी सजलेलं ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे आयटम साँग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचे उत्साही संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

थंड हवामानात उज्जैनमध्ये चित्रीत झालेल्या या गाण्याने गौतमी पाटीलच्या हॉट (Gautami Patil item song)अंदाजाने चाहत्यांना थिरकायला लावले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणतात की, “ही गाणी फक्त आयटम नंबर नाही, तर कथेला पूरक अशी गरज होती.”

‘वामा’ चित्रपटात स्त्री सन्मान, संघर्ष आणि आत्मगौरव यांची सशक्त मांडणी आहे. मुख्य भूमिकेत अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी असून, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर आणि जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!