संगीतमय दिवाळी पहाटेची पर्वणी ! अभिजात अकादमीचा अनोखा उपक्रम  

अभिजात अकादमी आणि सावरगाव-गंगावऱ्हे ग्रामपंचायतीतर्फे ७ नोव्हेंबरला ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

0

नाशिक,४ नोव्हेंबर २०२६ – (Diwali Pahat 2026) अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी आणि ग्रुप ग्रामपंचायत सावरगाव-गंगावऱ्हे यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा तिसऱ्या वर्षी ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.

‘मिटे अंधियारा मनका जब दीपक मनमें जले, मनदीप यॅूं जले जनका ज्यों सूरज से सब जागे’ या सुंदर भावनेतून साकार होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय नृत्यकलेच्या विविध शैलींचे दर्शन घडणार आहे.

यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद आदर्श शाळा, गंगावऱ्हे आणि सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, गंगावऱ्हे येथील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण व हिदुस्थानी संगीतावर सादर होणारे शिल्पा देशमुख व शिष्य परिवार यांचे भरतनाट्यम. तसेच दरवर्षी प्रमाणे अभिजातच्या भक्ती देशपांडे आणि विद्याहरी देशपांडे व शिष्य परिवार यांचे कथक नृत्य सादरीकरण ही होणार आहे.

शाळेचे विद्यार्थीनी कार्यक्रम स्थळी फुलांच्या रांगोळ्या ही करणार आहेत. एकूणच ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना कला सादरीकरणाची संधी मिळावी, भारतीय सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे आणि दिवाळीची पहाट (Diwali Pahat 2026) कलाविष्काराने मंगलमय व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.हा कार्यक्रम अभिजात अकादमी (गुरुकुल) स्टुडिओ, गंगावऱ्हे, गंगापूर धरण बॅकवॉटर परिसर, नाशिक येथे होणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२०६९२८६९ / ७४९९७२२६८३

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!