ऑपरेशन सिंदूरनंतर अल-कायदाची भारताला धमकी,सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

0

नवी दिल्ली, दि. ८ मे २०२५ (Operation Sindoor) ६ मेच्या रात्री अंमलात आणलेल्या ऐतिहासिक ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.हवाई दल आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत लोईटरिंग म्युनिशन (Loitering Munition) ड्रोनचा वापर करत जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयब्बा यांसारख्या संघटनांचे मुख्य ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर, दहशतवादी संघटना अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) ने भारताला धमकी दिली असून, भारत इस्लामविरोधी युद्ध लढत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, “प्रत्येक अत्याचाराचा बदला घेतला जाईल. हे युद्ध अंतिम श्वासापर्यंत चालेल.”

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान अक्षरशः बिथरला आहे. एका झटक्यात त्यांना अब्बाजान आठवला, आणि तिकडे जिना यांच्या कबरीला सुद्धा धक्का बसला असे चित्र आहे. भारताच्या अचूक आणि आक्रमक कारवाईने केवळ पाकिस्तानच नव्हे, तर जगभरातील दहशतवादी संघटनांच्या पायाखालची जमीनही सरकली आहे.

या कारवाईने विशेषतः अल-कायदा (Al-Qaeda) या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. त्यांच्या भारतीय उपमहाद्वीप शाखा AQIS (Al-Qaeda in Indian Subcontinent) ने ऑपरेशन सिंदूरवर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

अस-सहाब मीडिया (As-Sahab Media) या त्यांच्या प्रचारमाध्यमातून त्यांनी भारताला पोकळ, भावनिक आणि उधळट भाषा वापरून धमकी दिली आहे. भारताने इस्लामविरोधी युद्ध पुकारले आहे, असा आरोप करत त्यांनी जिहादची हाक दिली आहे.

भारताविरुद्ध जिहादची घोषणा
AQIS ने मुसलमानांना भारताविरोधात जिहाद छेडण्याचे आवाहन केले आहे. “हे अल्लाहचे युद्ध आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढू,” असा संदेश त्यांनी दिला आहे. या धमकीनंतर देशभरातील गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूरचे प्रमुख टप्पे:(Operation Sindoor)
तारीख व वेळ: ६ मे २०२५, रात्री १:३० ते १:५५

ठिकाणं: पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ – बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, मुझफ्फराबाद, कोटली, बाघ, गुलपूर, भीमबेर, चक अमरू

ड्रोन प्रकार: लोईटरिंग म्युनिशन (कामिकेझ ड्रोन्स)

उद्दिष्ट: दहशतवादी गटांचे प्रमुख तळ उद्ध्वस्त करणे

भारताची प्रतिक्रिया आणि संरक्षण यंत्रणा सज्ज
संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशननंतर त्वरित माहिती दिली असून, हल्ल्याचा उद्देश फक्त दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करणे हेच असल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या लष्करी तळांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलेले नाही.

Operation Sindoor. Al-Qaeda threatens India after

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!