आता नाशिकमध्ये कोरोनाची एंट्री :माजी खासदार हेमंत गोडसे कोरोना पॉझिटिव्ह

प्रशासन अलर्ट मोडवर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सूचना

0

नाशिक, ३ जून २०२५ – Nashik Covid Update मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता कोरोना विषाणूने (COVID-19) नाशिकमध्येही दस्तक दिली आहे. नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माजी खासदार हेमंत गोडसे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांनी कोविड चाचणी करून घेतली असता, ती सकारात्मक आली. सध्या त्यांच्या तब्येतीत फारशी गंभीर लक्षणं नसून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

हेमंत गोडसे यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की,”माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व आवश्यक ती काळजी घ्यावी.”

या घटनेमुळे नाशिक प्रशासन सतर्क झाले असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा, महापालिका व पोलीस विभाग अलर्ट मोडवर गेले आहेत.

💡 प्रशासन अलर्ट मोडवर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सूचना:(Nashik Covid Update)
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
मास्क वापरा
हात वारंवार धुवा
संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!