अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर –नीना कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार

🎉 १४ जूनला रंगणार भव्य पुरस्कार सोहळा

1

मुंबई | दिनांक: ६ जून २०२५ | प्रतिनिधी – Marathi Drama Awards नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि अभिनेते सुरेश साखवळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार सोहळा १४ जून २०२५, दुपारी ४ वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे पार पडणार असून, या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अध्यक्षस्थानी तर उद्योगमंत्री व नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

🏆 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी(Marathi Drama Awards)
🎟 व्यावसायिक नाट्य पुरस्कार
सर्वोत्कृष्ट लेखक: सुनिल हरिश्चंद्र, स्मिता दातार – उर्मिलायन

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अद्वैत दादरकर – शिकायला गेलो एक

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार: प्रदीप मुळ्ये – असेन मी नसेन मी

प्रकाशयोजनाकार: शीतल तळपदे – मास्टर माइंड

पार्श्वसंगीतकार: निषाद गोलांबरे – वरवरचे वधुवर

रंगभूषाकार: राजेश परब – गोष्ट संयुक्त मानापमानाची

सर्वोत्कृष्ट नाटक: असेन मी नसेन मी – संस्था: स्क्रीप्टज क्रिएशन

अभिनेता: सुव्रत जोशी – वरवरचे वधुवर

विनोदी अभिनेता: प्रशांत दामले – शिकायला गेलो एक

सहाय्यक अभिनेता: हृषीकेश शेलार – शिकायला गेलो एक

अभिनेत्री: नीना कुलकर्णी – असेन मी नसेन मी

विनोदी अभिनेत्री: शर्मिला शिंदे – ज्याची त्याची लव स्टोरी

सहाय्यक अभिनेत्री: शुभांगी गोखले – असेन मी नसेन मी

विशेष अभिनय पुरस्कार: निहारिका राजदत्त – उर्मिलायन

नाट्य परिषद युवा पुरस्कार: सुशांत शेलार

🎭 प्रायोगिक नाट्य पुरस्कार
संगीत नाटक: संगीत आनंदमठ – कल्पक ग्रुप, पुणे

प्रायोगिक नाटक: मिडिआ – रुद्रेश्वर, गोवा

दिग्दर्शक: मुकुल ढेकळे – मून विदाऊट स्काय

पुरुष कलाकार: यशवंत चोपडे – ब्लँक इक्वेशन

अभिनेत्री: पूनम सरोदे – वेटलॉस

गायक अभिनेता: अभिषेक काळे – संगीत अतृप्ता

गायक अभिनेत्री: अनुष्का आपटे – संगीत आनंदमठ

लेखक: डॉ. सोमनाथ सोनवळकर – द फिलिंग पॅरोडॉक्स

🎤 रसिक प्रेक्षकांसाठी हा सोहळा ठरणार आहे एक नाट्यप्रेमाचा उत्सव!
मराठी रंगभूमीच्या मान्यवरांचा सन्मान आणि नवोदितांना प्रेरणा देणारा हा दिवस.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!