
मुंबई, दि. ११ जून २०२५ – Raj Thackeray latest news महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस येत्या १४ जून रोजी असतो, आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून असंख्य मनसैनिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील शिवतीर्थावर येण्याची तयारी करत होते. मात्र यंदा राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब मुंबईबाहेर असल्यामुळे ही भेट शक्य होणार नाही, अशी माहिती त्यांनी एका भावनिक पत्रकाद्वारे दिली.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात मनसैनिकांना उद्देशून म्हटले की, (Raj Thackeray latest news)
“मी या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही असा अर्थ काढू नका. तुमच्या शुभेच्छा, प्रेम हेच माझं मोठं बळ आहे. शिवतीर्थावर यायचं नाही, पण तुमच्या भागात लोकोपयोगी कार्य करून वाढदिवस साजरा करा.”
या निर्णयामुळे अनेक मनसैनिकांचा हिरमोड झाला असला तरी राज ठाकरेंनी पत्रकात भावनिक शब्दांत आपली प्रेमभावना व्यक्त करत लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याचं आश्वासन दिलं आहे.
📌 राज ठाकरे यांच्या पत्रकातील काही महत्त्वाचे मुद्दे:
१४ जून २०२५ रोजी राज ठाकरे सहकुटुंब मुंबईबाहेर असतील.
कोणतेही राजकीय किंवा वैयक्तिक कारण नसून, फक्त नियोजन असल्यामुळे भेट शक्य नाही.
“तुम्ही तुमच्या भागात समाजोपयोगी कार्यक्रम राबवा, हाच माझ्यासाठी खरा वाढदिवस असेल”, असे राज ठाकरे यांनी नम्रपणे आवाहन केले.
लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन मनसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे आश्वासन.
राज ठाकरे आपल्या पत्रकात काय म्हणतात
सस्नेह जय महाराष्ट्र !
येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी आपली भेट होणे शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजय का करणार नाहीये याचे काही विशेष कारण आहे का ? इत्यादी पण मनापासून सांगतोय की खरंतर असे कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका,गेली अनेक दशके माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही पण तुमचे दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावले असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम । आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहील .या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच
पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन ध्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन.
त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू.महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
आपला नम्र
राज ठाकरे
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,
सस्नेह जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/tNKyuHkCgm— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2025


[…] […]
[…] वर्तुळ पुन्हा एकदा फिरू लागलं आहे. राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांची मनसे-शिवसेना युती होणार की […]
[…] ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. […]