एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५ :आर.राजेंद्र ठरला स्पर्धेचा सुपरस्टार !

नाशिकच्या स्पोर्ट्स टूरिझमसाठी नवा अध्याय

0

नाशिक,१५ जून २०२५ – MRF TwoWheeler Rally Nashik त्र्यंबकेश्वरजवळील निसर्गरम्य आंबोली ते हरसूल मार्गावर एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५ स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. टीव्हीएस टीमचे आर. राजेंद्र यांनी सुपर बाईक (प्रो एक्सपर्ट) गटात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांची मने जिंकली. तीन फेर्‍यांमध्ये १३.५ किलोमीटरचा डोंगराळ रस्ता पार करत स्पर्धकांनी जीवाची बाजी लावली.

या राष्ट्रस्तरीय दुचाकी रॅलीमध्ये एकूण ७० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी ६४ जणांनी रेस यशस्वीरित्या पूर्ण केली. नाशिकच्या तरुण मोटर क्रीडाप्रेमींसोबत आदिवासी बांधवांनीदेखील रॅलीचा थरार अनुभवत आनंद लुटला. स्पर्धेचे आयोजन ए. डब्ल्यू. इव्हेंट्सच्या वतीने करण्यात आले होते.

स्पर्धेतील विजेते (MRF TwoWheeler Rally Nashik)

🔹 वर्ग १: सुपर बाईक (प्रो एक्सपर्ट) – ५०० सीसी पर्यंत
🥇 1. आर. राजेंद्र (टीव्हीएस)
🥈 2. अब्दुल वाहिद
🥉 3. सॅम्युअल जेकब

🔹 वर्ग २: सुपर बाईक (तज्ञ) – ५०० सीसी पर्यंत
🥇 1. संजय सोमशेखर
🥈 2. नटराज आर
🥉 3. सिनान फ्रान्सिस

🔹 वर्ग ३: सुपर स्पोर्ट्स १६५ सीसी गट ब
🥇 1. नित्यन एल
🥈 2. अब्दुल रहमान
🥉 3. भारत एल

🔹 वर्ग ४: सुपर स्पोर्ट १६५ – २६० सीसी गट ब
🥇 1. इम्रान पाशा
🥈 2. करणकुमार
🥉 3. बंटेइलांग जायरवा

🔹 वर्ग ५: सुपर स्पोर्ट २६० – ४६० सीसी गट ब
🥇 1. राजेश नाराजन स्वामी
🥈 2. अकबर
🥉 3. मधुसूदन एस

🔹 वर्ग ६: स्कूटर २१० सीसी पर्यंत गट ब
🥇 1. सय्यद आसिफ अली
🥈 2. शमीम खान
🥉 3. गौतम एन

🔹 वर्ग ७: महिला – ४६० सीसी पर्यंत गट ब
🥇 1. ऐश्वर्या पिसे
🥈 2. रिहाना बी
🥉 3. सौम्या चौधरी

🔹 वर्ग ८: सुपर स्टॉक १६५ – २६० सीसी गट ड
🥇 1. जगदीश
🥈 2. आशुतोष कौशिक
🥉 3. थंगराज

🔹 वर्ग ९: सुपर स्टॉक २६० – ४६० सीसी गट ड
🥇 1. चेतन होसत्ती
🥈 2. दुर्गेश जे
🥉 3. शिवम सोनवणे

🔹 वर्ग १०: स्टार ऑफ महाराष्ट्र
🥇 1. क्लिंटन जॉन कॉर्डेरो
🥈 2. अभिषेक एम. परदेशी
🥉 3. अभिमन्यू रे

पारितोषिक वितरणाचा जल्लोष
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर एमआरएफचे मधुसूदन आर, उद्योजक विक्रांत चांदवडकर, सुरेश अण्णा पाटील (गोदा श्रद्धा फाउंडेशन), मिलिंद हिरे (श्रीहरी लॉन्स), संदीप कडलग यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. ए. डब्ल्यू. इव्हेंट्सच्या सहकाऱ्यांचे संयोजनही वाखाणण्याजोगे होते.

नाशिकच्या स्पोर्ट्स टूरिझमसाठी नवा अध्याय
ही स्पर्धा केवळ रेस नव्हती, तर नाशिकच्या मोटर क्रीडा पर्यटनाला चालना देणारा उपक्रम ठरला. देशभरातून आलेल्या नामांकित रेसर्सनी नाशिककरांना थरारक क्षणांची भेट दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!