ऐतिहासिक घडामोड: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं पहिलं एकत्रित आवाहन

विजयी मेळाव्यासाठी "५ जुलै रोजी मराठी बाणा दाखवा – गुलाल उधळत या, वाजत गाजत या!

3

मुंबई, १ जुलै २०२५ – Raj Thackeray Uddhav Thackeray त्रिभाषा धोरणाविरोधातील यशस्वी लढ्यानंतर ठाकरे बंधूंनी – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – पहिल्यांदाच संयुक्तपणे सर्व मराठी बांधवांना भव्य “विजयी मेळाव्या”साठी आवाहन केलं आहे.
हा मेळावा ५ जुलै रोजी वरळी डोम, मुंबई येथे सकाळी १० वाजता पार पडणार असून, तो मराठी अस्मितेचा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.

📝 ठाकरे बंधूंचं एकत्र पत्रक – “आवाज मराठीचा…”(Raj Thackeray Uddhav Thackeray)
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकात असं म्हटलं आहे:

“सरकारला नमवलं का? हो नमवलं! पण कोणी? तुम्हीच! मराठी जनतेनं हे शक्य केलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने आवाज उठवला. त्यामुळे हा जल्लोष तुमचा आहे – आम्ही आयोजक आहोत, नायक नाही… वाजत-गाजत या, गुलाल उधळत या – आम्ही वाट बघतोय…”

या पत्रकावर प्रथमच दोघांची नावं एकत्र झळकली – “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे”.

📢 एकत्र व्यासपीठावर राज आणि उद्धव – जनतेला मोठा संदेश
५ जुलै रोजी या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसणार असून, या एकत्र येण्यामागे आगामी राजकीय समीकरणांची चाहूलही अनेकांना वाटते आहे.

नियोजनात प्रमुख जबाबदारी:
शिवसेना (UBT) – संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई

मनसे – बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई

रात्री ९.३० वा. नेत्यांकडून एनएससीआय (NSCI) ची पाहणी होणार आहे.

💬 संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना दिलं थेट निमंत्रण!

संजय राऊत यांनी एक्स (Twitter) वरून हे पत्रक शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना थेट टॅग करत निमंत्रण दिलं.

“मराठीच्या मारेकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या शत्रूंना आवाज देणारी जागृती – यावे जागराला…”, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला आहे.

🌟 या कारणांनी मेळावा ठरणार ऐतिहासिक:
ठाकरे बंधू एकत्रित व्यासपीठावर

त्रिभाषा धोरणाविरोधातील विजयाचा जल्लोष

मराठी अस्मितेचा नवा उठाव

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण पावती?

📍 स्थळ: वरळी डोम, मुंबई | 🗓️ दिनांक: ५ जुलै २०२५, सकाळी १० वा.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

3 Comments
  1. […] आयोजित ‘विजयी मेळाव्या’मध्ये ठाकरे बंधूंच्या गळाभेटीने संपूर्ण महाराष्ट्राचे […]

  2. […] मिरा रोडमध्ये झालेल्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,”हिंदी […]

Don`t copy text!