आजचे राशिभविष्य – बुधवार, ३० जुलै २०२५

1

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

📅 श्रावण शुक्ल षष्ठी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसु नाम संवत्सर | दक्षिणायन

🕛 राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०

🌟 विशेष: श्रीयाळ षष्ठी स्त्रियांनी व्रत करण्याचा विशेष दिवस

🌠 नक्षत्र: हस्त / (रात्रि ९.५३ नंतर) चित्रा

👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: कन्या

🔔 टीप: तुमचे नाव जरी एखाद्या राशीशी जुळत असले, तरी तुमची खरी रास कुंडलीनुसार वेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी भेट द्या 👉राशीभाव” फेसबुक पेजला (Marathi Rashi Bhavishya)

🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

चंद्र-बुध लाभयोग आणि गुरुचा केंद्र योग! व्यावसायिक यश, घरगुती आनंद, बागकाम व पाळीव प्राण्यांमुळे तणावमुक्ती.

🟠 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कला, सौंदर्य, संगीताची ओढ. आज छंदातून अर्थलाभ, महिलांना दागिने मिळतील. पण वारसाहक्काची समस्या कायम.

🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

वक्तृत्वशक्तीचा प्रभाव वापरा. घरात तुमचं कौतुक. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणं आज जमत नाही.

🔵 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

खवय्या आणि कुकिंगमध्ये पटाईत. आज तुमच्या या गुणांचं कौतुक. चांगली आर्थिक आवक. धार्मिक कार्य अपूर्ण राहू शकते.

🟣 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

ग्रहमान संमिश्र. द्वितीय चंद्र. निर्णयात चुका होण्याची शक्यता. संयम ठेवा. सल्ला घ्या. केतू जप उपयुक्त.

🟢 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

आजचा दिवस पूर्णतः अनुकूल. व्यवसायात प्रगती. मित्रांपासून लाभ. संशोधन क्षेत्रात विशेष यश.

तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

चंद्र प्रतिकूल. धार्मिक कार्य करा, तीर्थयात्रा शक्य. इतर सहली टाळा. बदली किंवा कामातील बदल संभवतो.

वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

आज ग्रहमान अनुकूल. अपेक्षेनुसार काम होणार. धर्मकार्याची प्रेरणा मिळेल. प्रवास लाभदायक.

🟤 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

दशम चंद्र. कामावर लक्ष केंद्रित करा. अधिकारी वर्गात मान वाढेल. सरकारी कामांमध्ये थोडी प्रतीक्षा लागेल.

🟡 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

अनुकूल आर्थिक दिवस. धार्मिक कृत्यांमुळे लाभ होईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

🔵 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

थोडी प्रतिकूलता. संगणक क्षेत्रात यश. मौल्यवान वस्तू मिळतील. संतती संबंधित चिंता. वाहन चालवताना काळजी घ्या.

🟣 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

व्यवसायासाठी अनुकूल दिवस. संततीकडून शुभवार्ता. घरगुती वातावरण थोडं तणावपूर्ण. संवाद वाढवा.

३० जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आशावादी, उदार व नशीबवान असतात. धार्मिक स्थळांना भेट देणे तुम्हाला आवडते. काही चांगले गुण सुप्त स्थितीत असून बोलण्यात मोकळेपणा असतो. तुमच्यात उत्साह असूनही तुम्ही सतत अस्वस्थ असतात. कल्पनाशक्ती उत्तम असल्याने उत्तम दर्जाचे कलाकार, संगीतकार, लेखक होऊ शकतात. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. तुम्ही कष्टाळू व उद्योगी असतात. बहुत करून आयुष्यात यश मिळते परंतु घरात कटकटी चालू असतात. अडचणींवर मात करण्याची शक्ती असते. आपल्या स्वतःच्या घराबद्दल व देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास करणे, इतर देशांचा अभ्यास करून स्वतःचे ज्ञान वाढवणे तुम्हाला आवडते. संशोधन करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. एकाच वेळी खंबीरपणा व भित्रेपणा असे दोन्ही गोष्टी तुमच्या मध्ये अनुभवास येतात. विचारात आणि वागण्यात स्वतंत्रपणा असतो. धर्मबद्दल स्वतःच्या वेगळ्याच कल्पना असल्याने ठराविक व मान्यवर मार्गाचा अवलंबन करणे तुम्हाला आवडते. स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला आवडतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. कायदे, नियम पाळण्यास

महिला:- तुम्ही परिस्थितीशी समझोता करणारे व निष्ठावान असतात. तुम्ही चांगल्या माता असून आपल्या मुलांवर व घरावर प्रेम करता. शांतता व आदर याचे तुम्ही प्रतीक असतात. तुम्ही पतीच्या व्यवसायात लुडबुड करीत नाहीत. काही वेळा चमत्कारिकपणा, चंचलपणा याचा प्रत्यय येतो. त्यामुळे घरात कटकटीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार शुक्रवार

शुभ रंग:-पिवळा ,जांभळा ,हिरवा आणि अंजिरी

शुभ रत्ने :- पुष्कराज ,ॲमेथिस्ट लसण्या.

 

🔮 सल्ला हवे आहे का?

तुमचे भाग्य, गुण, दोष, जोडीदाराचे स्वभाव, योग्य रत्ने आणि उपाय जाणून घ्या आजच कुंडली विश्लेषन करून घ्या.

📞 संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!