ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल नवमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र -पू.षा/ (आज सकाळी ८.०६ नंतर) उ. षा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/ (दुपारी २.२७ नंतर) मकर (अतिगंड योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी शुभ कालावधी आहे. दुपारनंतर नोकरीच्या ठिकाणी अनुकूलता जाणवेल. स्थान लाभ होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सकाळच्या सत्रात प्रतिकूल ग्रहमानाचा सामना करावा लागेल. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावला जाईल. खर्चात वाढ होईल. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. अनुकूल शनी अचानक कुठून तरी मदत पाठवीन.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण कर्णयचा प्रयत्न करा. अर्थात तेथे देखील फारशी अनुकूलता नाही. मन धार्मिक विचारांनी भरून जाईन. दशम शनी काही सुखद घटना घडवून आणेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) षष्ठ आणि सप्तम स्थानी चंद्र आहे. योग्य कारणासाठी खर्च होईल. तुमचा धार्मिक कार्याकडे ओढा असतो. आज त्यासाठी वेळ दयावा लागेल. दूरचे प्रवास घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पंचम आणि षष्ठ स्थानी चंद्र आहे. आज गुरुची अनुकूलता कमी जाणवेल. खरेदी होईल. कर्जे मंजूर होतील. मात्र त्यास अधिक विलंब लागेल. नोकरीच्या ठिकाणी अचानक एखादा सुखद प्रसंग घडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चतुर्थ चंद्राचा दशम गुरुशी प्रतियोग आहे. नोकरीत सावधानता बाळगल्यास अनेक चांगल्या संधी मिळतील. मोजके बोलणे हिताचे आहे. दूरच्या प्रवासाचे नियोजन होईल. आर्थिक कमतरता पडणार नाही.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. तृतीय चंद्र सर्वार्थाने सौख्य आणि पराक्रम देईन. मोठे धाडस कराल. कुलदेवतेची कृपादृष्टी राहील. वास्तू किंवा जमीन खरेदीचे योग आहेत.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सकाळी फारशी अनुकूलता नाही. बोलताना काळजी घ्या. शक्यतो कर्जे घेणे टाळा. तुमच्या निर्णयाचा पुनः अनेकदा विचार करा. उत्तराध थोडा अनुकूल आहे. एखाद्या नात्यातील व्यक्तीचे परदेश गमन होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज सकाळी चंद्र तुमच्या राशीत आहे. मन आनंदी राहील. चटकदार भोजन करण्याची इच्छा निर्माण होईल. इतरांना देखील मेजवानीच आमंत्रण द्याल. उत्तरार्ध अचानक धनलाभाचा आहे. संपत्ती वाढेल.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात फारशी चांगली नाही. काही कटू अनुभव येऊ शकतात. धर्म कार्य कराल. दानधर्म करण्यास अनुकूल केवढी आहे. उत्तरार्ध अनुकूल आहे. मनासारख्या घटना घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाची सुरुवात चंद्राच्या अनुकूलतेने होणार आहे. या वेळात महत्वाची कामे पूर्ण करा. मुलांशी संवाद साधा. त्यांच्या अडचणी समजावून घ्या. उत्तरार्ध आणि नंतरचे दोन दिवस खर्च वाढवणारे आहेत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. आळस झटकून कामाला लागा. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात वाढ होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. नैतिक कामे करतांना काळजी करू नका. यश तुमचेच आहे.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
