
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल एकादशी/द्वादशी.
विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
चंद्र – कुंभ आणि मीन राशीत, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा नक्षत्रात. (व्याघात योग आणि विष्टी करणं शांती)
राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००
आज क्षय तिथी आहे. *भागवत एकादशी, तुलसी विवाह प्रारंभ, पंढरपूर यात्रा, चातुर्मास समाप्ती*(Marathi Rashi Bhavishya)
मेष: दिवस आनंददायी. कामात प्रगतीचे संकेत. कौटुंबिक आनंद वाढेल. सर्जनशील कल्पनांना वाव मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ: आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक विषयांवर संयम आवश्यक. संध्याकाळी मनःशांती मिळेल.
मिथुन: आज नातेसंबंध दृढ होतील. मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. कामात गती येईल.
कर्क: व्यावसायिक क्षेत्रात नवे यश. वरिष्ठांकडून प्रशंसा. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम घडू शकतो. आरोग्य चांगले.
सिंह: प्रवास योग उत्तम. नवे ज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल.
कन्या: आर्थिक स्थितीत सुधारणा. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील. भावंडांशी संबंध सुधारतील. मात्र आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
तूळ: सकाळी पंचम चंद्र असल्याने दिवस अत्यंत शुभ. कामात यश, प्रवास लाभदायक, दैव अनुकूल. सुदैव चमकेल.
वृश्चिक: काही मानसिक ताण जाणवू शकतो. गुप्त शत्रूं पासून सावध राहा. संयम ठेवा. ध्यान व विश्रांती उपयुक्त ठरेल.
धनु: भागीदारीतून लाभ. दांपत्य जीवनात आनंद वाढेल. नवीन लोकांशी संपर्क लाभदायक ठरेल. आर्थिक वाढ संभवते.
मकर: आज कामाचा व्याप जास्त. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल.
कुंभ: प्रेमसंबंधात आनंददायक घडामोडी. मुलांशी संवाद वाढेल. सर्जनशीलतेसाठी योग्य काळ. मनोरंजनाचा आनंद घ्याल.
मीन: घरगुती विषयांवर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थैर्य राहील.
आजचा शुभ रंग: पांढरा
आजचा मंत्र: “ॐ नमः शिवाय”
विशेष टीप:
चंद्र उत्तराभाद्रपदा नक्षत्रात असल्याने आध्यात्मिक विचारांना चालना मिळेल; ध्यान, पूजा व दानासाठी अतिशय अनुकूल दिवस.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)




[…] […]