
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण सप्तमी विश्वावसुनाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८१
चंद्र – कर्क राशीत.
आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे. (विष्टी करणं शांती)
नक्षत्र – पुष्य नक्षत्र (दुपारीपर्यंत), त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. मंगळवार – भगवान हनुमान व मंगळ ग्रह उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस
राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३० (Marathi Rashi Bhavishya)
मेष (Aries)आज उत्साह वाढेल. नोकरीत प्रगती होईल. काही जुन्या अडथळ्यांचा शेवट होईल. दुपारनंतर शुभ फल. उपाय: हनुमान चालिसा वाचा आणि सिंदूरयुक्त तेल अर्पण करा.
वृषभ (Taurus)आज आर्थिक दृष्ट्या सावध राहा. काही अनपेक्षित खर्च संभवतो. पण मित्रांच्या मदतीने कार्य पूर्ण होईल. उपाय: गणपतीला दूर्वा आणि मोदक अर्पण करा.
मिथुन (Gemini)कार्यक्षेत्रात नवीन योजना आखाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरगुती वातावरण सौख्यदायक राहील. उपाय: विष्णू मंदिरात तूपाचा दीप लावा.
कर्क (Cancer)चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिक उतार-चढाव येतील. संयम ठेवा. जोडीदाराकडून आधार लाभेल. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. उपाय: शिवलिंगावर दूध व जल अर्पण करा.
सिंह (Leo)चंद्र तुमच्या व्यय स्थानी असल्याने अजूनही फारशी अनुकूलता नाही. मन अस्वस्थ राहू शकते. महिला अधिक भावनिक होतील. आज महत्वाची कामे नकोत. उपाय: सूर्याला अर्घ्य द्या व रामनामाचा जप करा.
कन्या (Virgo)जुने मित्र भेटतील. आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस. घरात आनंदाचे वातावरण. उपाय: हनुमानाला गूळ व चणे अर्पण करा.
तुला (Libra)प्रेमसंबंध दृढ होतील. वरिष्ठांचा सल्ला लाभदायक. प्रवास शुभ. उपाय: श्रीविष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)परिश्रमाचे फळ मिळेल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य सुधारेल. उपाय: हनुमान मंदिरात नारळ आणि लाल फुलं अर्पण करा.
धनु (Sagittarius)धार्मिक कार्यात रुची वाढेल. मानसिक स्थैर्य लाभेल. दूरस्थ ठिकाणी प्रवास फायदेशीर. उपाय: केशर तिलक लावा आणि विष्णूला अर्पण करा.
मकर (Capricorn)कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. शांतता राखा. संध्याकाळी परिस्थिती सुधारेल. उपाय: शनिदेवाला काळे तीळ व तेल अर्पण करा.
कुंभ (Aquarius)आज तुमची निर्णयक्षमता उत्तम राहील. नवे करार किंवा व्यवहारासाठी शुभ दिवस. उपाय: हनुमानाला लाल फुल अर्पण करा.
मीन (Pisces)धार्मिक प्रवास किंवा पूजा-पाठाचे योग. आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य उत्तम राहील. उपाय: भगवान विष्णूला दुधात मिसळलेली केशर खीर अर्पण करा.
आजचा शुभ विचार
:“प्रत्येक प्रयत्न ही प्रार्थना असते — मनापासून केल्यास तिचं फळ नक्कीच मिळतं.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



