
मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२५ – Marathi serial latest update स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “लपंडाव” मध्ये सध्या सखी आणि कान्हाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाच्या या आनंदमय वातावरणात मालिकेतील या जोडीने एक वेगळाच अंदाज दाखवला — हटके प्री-वेडिंग फोटोशूट!
हे खास फोटोशूट भव्यदिव्य सिनेसिटी स्टुडिओ मध्ये पार पडले, जिथे जगभरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा भव्य पद्धतीने प्री-वेडिंग शूट करण्यात आले आहे.
सखी-कान्हा म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव यांनी पारंपरिक आणि मॉडर्न अशा तीन वेगवेगळ्या लूकमध्ये हे फोटोशूट केले. दोघांसाठी हा अनुभव अत्यंत रोमांचक होता.
कृतिका देव म्हणाली, “आमचं खऱ्या आयुष्यात प्री-वेडिंग शूट झालं नाही, त्यामुळे हा अनुभव अनोखा होता. सिनेसिटीमध्ये शूट करताना प्रत्येक क्षण भन्नाट वाटला.” तर चेतन वडनेरे म्हणाले, “नेहमीच्या मालिकेच्या शूटिंगपेक्षा हे काहीतरी हटके आणि धमाल होतं.”
लवकरच हे खास क्षण प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे “लपंडाव” दुपारी २ वाजता, फक्त स्टार प्रवाह वर पाहायला विसरू नका!(Marathi serial latest update)



