
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
मार्गशीर्ष कृष्ण तृतीया/चतुर्थी |
*संकष्ट चतुर्थी* चंद्रोदय मुंबई – ८.३४, नाशिक – ८.२८, पुणे ८.३१.
चंद्र – मिथुन/कर्क.
आज फक्त सकाळी ८.०० पर्यंत उत्तम दिवस.
दक्षिणायन | हेमंत ऋतू | शके १९४७ | संवत २०८२
योग : रवी षडाष्टक चंद्र. चंद्र त्रिकोण बुध . चंद्र युती गुरू . चंद्र त्रिकोण शनी .
चंद्र लाभ हर्षल . मंगळ षडाष्टक गुरू . बुध त्रिकोण शनी
राहू काळ: (प्रादेशिक वेळेनुसार साधारणतः) दुपारी ४:३० ते ६:००
सकाळी ८.०० पर्यंत अत्यंत शुभ, त्यानंतर कार्ये सावधगिरीने हाताळावीत.
चंद्र–गुरू युती, बुध–त्रिकोण, शनी–त्रिकोण यामुळे बौद्धिक कार्य, आर्थिक नियोजन, शिक्षण, महत्वाची चर्चा, दान–धर्म, आध्यात्मिक कार्यांसाठी चांगला दिवस.(Marathi Rashi Bhavishya)
मेष – सकाळी महत्वाचे काम पूर्ण करा. बुद्धिमत्ता तीक्ष्ण. आर्थिक नियोजन फायदेशीर. दुपारी संभाषणात सौम्यता ठेवा. प्रवासात विलंब.
वृषभ – सकाळ अत्यंत शुभ. चंद्र–गुरू युतीमुळे आर्थिक लाभ. नाव–प्रतिष्ठा वाढेल. दुपारनंतर उगाच ताण घेऊ नका. आरोग्य ठीक.
मिथुन –मन प्रसन्न, बौद्धिक कामात यश. नवीन मार्ग खुलतील. परदेशसंबंधी कामात प्रगती. दुपारी अति विचार टाळा.
कर्क –आज घरगुती वातावरण आनंदी. नोकरीत सुधारणा. वरिष्ठांकडून प्रोत्साहन. दुपारी भावनिक अस्थिरता होऊ शकते.
सिंह –सकाळी लाभयोग. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. प्रवासातील कामांमध्ये यश. दुपारनंतर संवादात संयम ठेवणे आवश्यक.
कन्या – आर्थिक सुधारणा. महत्वाचे करार सकाळी पूर्ण करा. दुपारनंतर ताण येऊ शकतो. शारीरिक ऊर्जा सांभाळा.
तुळ – भाग्य तुमच्या बाजूने. चंद्र–बुध योगामुळे संवाद उत्कृष्ट. दांपत्य जीवनात आनंद. दुपारी मतभेद टाळा.
वृश्चिक – कामात गती. अडकलेली कामे सुटतील. आर्थिक लाभ. दुपारी आरोग्याची काळजी घ्या आणि वाद टाळा.
धनु – क्रिएटिव कामात यश. प्रेमसंबंधात गोडवा. संकष्ट चतुर्थी व्रतासाठी शुभ. दुपारनंतर हलका मानसिक ताण.
मकर – घर–कुटुंबातील कामात यश. मालमत्ता, वाहन विषय शुभ. वरिष्ठांकडून लाभ. दुपारनंतर कामात अडथळे.
कुंभ- मीटिंग्स, व्यवहार, कागदपत्रे सकाळी पूर्ण करा. चंद्र–गुरू योगामुळे लाभ. दुपारी गैरसमज टाळा.
मीन – आर्थिक सुधारणा. अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत. बुद्धिमत्ता वापरल्यास यश निश्चित. दुपारनंतर मानसिक थकवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] […]