prsanna

कष्टकऱ्यांचा आधार हरपला ! ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे निधन

0

पुणे, दि. ८ डिसेंबर २०२५ Baba Adhav Passed Away महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीचे प्रखर प्रवर्तक, कष्टकऱ्यांचे खरे तारणहार आणिहमाल पंचायत’चे जनक बाबा आढाव यांचे आज रात्री ८.२५ वाजता पुण्यात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती आणि उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक लढवय्या, नि:स्वार्थ आणि तळागाळातील जनतेसाठी लढणारा नेता गमावला आहे.गेल्या दहाबारा दिवसांपासून ते पुण्यातीलपुना हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत होते. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते; मात्र प्रकृतीने साथ सोडली. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती.

आयुष्यभराची लढाई कष्टकऱ्यांसाठी, न्यायासाठी, समतेसाठी(Baba Adhav Passed Away)

१९३० मध्ये पुण्यात जन्मलेले बाबा आढाव पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर; पण मनाने शुद्ध समाजवादी. राष्ट्र सेवा दलातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा मिळाली आणि तिथूनच त्यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. १९५२ च्या दुष्काळात त्यांनी पहिला सत्याग्रह केला. त्यानंतर जीवन समर्पित झाले ते हमाल, मजूर, असंघटित कामगार, रिक्षाचालक, दलित, शेतकरी आणि तळागाळातील वंचित घटकांसाठी.

बाबा आढाव यांचे ऐतिहासिक कार्य

हमाल पंचायत (1955) असंघटित मजुरांना संघटित करून किमान मजुरी, सामाजिक सुरक्षाहक्क मिळवून देण्याची महान पहल.,महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा (1969) भारतीय मजूर चळवळीतील टर्निंग पॉइंट.,कष्टाची भाकर योजना (1974) मजुरांना पौष्टिक आणि स्वस्त अन्नाची हमी.,एक गाव एक पाणवठा चळवळ ग्रामीण जातीयतेवर थेट प्रहार; दलितांना पाण्याचे स्वातंत्र्य.अंधश्रद्धाविरोधी आणि लोकशाही बचाव चळवळीतील सक्रिय नेतृत्व ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी, तर्कनिष्ठतेचा आग्रह.

आज लाखो कष्टकरी आणि वंचित घटकांच्या उन्नतीमागे ज्या हातांनी वाट मोकळी केली, तो हात काळाने हिरावून घेतला. त्यांच्या निधनाने समाजवादी आणि पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ कोसळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.बाबा आढाव यांनी ज्या संघर्षातून समाजाला दिशा दिली, तो विचारांचा दिवा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!