

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष कृष्ण एकादशी षटतिला एकादशी.
मकर संक्रांती.
विश्वावसुनाम संवत्सर शके १९४७, संवत २०८२ हेमंत ऋतू, उत्तरायण
राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
“आज आनंदी दिवस आहे”
नक्षत्र – अनुराधा (दिवसभर) चंद्रराशी – वृश्चिक
ग्रहयोग
बुध प्रतियुती गुरू
बौद्धिक स्पष्टता, योग्य निर्णयक्षमता
धार्मिक-सात्त्विक विचारांना चालना
१४ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही सकारात्मक विचारसरणीचे व आनंदी स्वभावाचे असता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढण्याची कला तुम्हाला अवगत आहे. बुद्धी आणि व्यवहारज्ञान यांचा सुरेख समन्वय तुमच्यात आढळतो. लोकांशी संवाद साधण्यात तुम्ही कुशल आहात.
तुमच्यात नेतृत्वगुण असून योग्य वेळी कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे. आर्थिक बाबतीत सावध पण दूरदृष्टीने विचार करणारे आहात. धार्मिक-आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ असते. मात्र कधी कधी अती विचार केल्यामुळे निर्णयात विलंब होतो.
वयाच्या ३६–४० नंतर भाग्योदय होतो. शिक्षण, सल्लागार, अध्यापन, लेखन, व्यवस्थापन, कायदा, ज्योतिष, बँकिंग क्षेत्रात यश मिळते.
शुभ दिवस – बुधवार, गुरुवार, सोमवार
शुभ अंक – ३, ५, ६
शुभ रंग – हिरवा, पिवळा
मेष :-आज उत्साह वाढलेला असेल. संक्रांतीमुळे शुभ कार्याची इच्छा होईल. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घ्याल. आनंदी वातावरण राहील.
वृषभ :-कुटुंबात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. गुरू-बुध योगामुळे विचार स्पष्ट राहतील. नवीन कल्पनांवर चर्चा होईल.
मिथुन :-आजचा दिवस लाभदायक आहे. लेखन, शिक्षण, संवाद क्षेत्रात यश मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल.
कर्क :-भावनिक समाधान मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल.
सिंह :-मान-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा.
कन्या :-बुध-गुरू प्रतियुतीमुळे अभ्यास, संशोधन, नियोजन यासाठी उत्तम दिवस. आरोग्य सुधारेल.
तुळ :-भागीदारी व्यवहारात यश मिळेल. संवादातून गैरसमज दूर होतील. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक :-आजचा दिवस अतिशय आनंददायी आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी चालून येतील. धार्मिक-आध्यात्मिक लाभ मिळेल.
धनु :-प्रवास योग संभवतो. गुरू कृपेमुळे कामात गती येईल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील.
मकर :-मकर संक्रांतीमुळे विशेष शुभ फल. आर्थिक लाभ, कुटुंबात आनंद. नवीन सुरुवातीस योग्य दिवस.
कुंभ :-मित्रमंडळींशी सुसंवाद वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मानसिक समाधान मिळेल.
मीन :-सर्जनशीलतेला वाव मिळेल. कला, लेखन, अध्यात्म यात मन रमेल. दिवस शांततेत जाईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] […]