

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष कृष्ण चतुर्दशीविश्वावसूनाम संवत्सर
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – मूळ (सकाळी ८.१२ पर्यंत) / त्यानंतर पूर्वाषाढाचंद्र राशी – धनु(व्याघात योग, विष्टी करण शांती)
ग्रहस्थिती :
रवी लाभ चंद्र,
रवी त्रिकोण हर्षल,
चंद्र प्रतियुती गुरू,
शुक्र लाभ नेपच्यून.
१७ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर रवी व गुरू या ग्रहांचा प्रभाव अधिक दिसून येतो. तुम्ही आत्मविश्वासी, स्पष्टवक्ते आणि नेतृत्वगुण असलेले व्यक्तिमत्व आहात. स्वतःच्या मतांवर ठाम राहणे, सत्यासाठी उभे राहणे आणि ध्येयपूर्तीचा हट्ट ही तुमची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
तुम्हाला स्वातंत्र्य प्रिय असते. नवनवीन ठिकाणी जाणे, ज्ञान मिळवणे आणि अनुभव समृद्ध करणे तुम्हाला आवडते. अध्यात्म, तत्त्वज्ञान, कायदा, प्रशासन, शिक्षण किंवा मार्गदर्शनाच्या क्षेत्रात तुम्ही चांगली प्रगती करू शकता.
कधी कधी अति आत्मविश्वास किंवा थेट बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात. संयम, ऐकून घेण्याची तयारी आणि सातत्य ठेवल्यास जीवनात मोठे यश मिळते.
व्यवसाय : शिक्षण, प्रशासन, कायदा, प्रवास, अध्यात्म, सल्लागार, व्यवस्थापन
शुभ दिवस : रविवार, गुरुवार
शुभ रंग : पिवळा, केशरी, सोनेरी
शुभ रत्ने : पुष्कराज, माणिक
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-आज संयम आवश्यक आहे. कामे रखडू शकतात. वरिष्ठांशी वाद टाळा.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. घरातील वातावरण शांत ठेवा.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-मन अस्थिर राहील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकळावेत. संवादात गैरसमज संभवतात.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-आरोग्याकडे लक्ष द्या. विश्रांती आवश्यक आहे. भावनिक निर्णय टाळा.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-मित्रांशी मतभेद संभवतात. बोलताना शब्द जपून वापरा.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-कामाचा ताण वाढेल. संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-प्रवास टाळावा. कायदेशीर बाबतीत सावध रहा.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. कोणावरही अंधविश्वास नको.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-चंद्र तुमच्याच राशीत आहे, पण गुरू प्रतियुतीमुळे गोंधळ संभवतो. मोठे निर्णय टाळा.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-नोकरीत दबाव जाणवेल. वरिष्ठांशी संयमाने वागा.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-संतती किंवा सर्जनशील विषयात चिंता राहील. आज विश्रांती घ्या.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. भावनिक स्थैर्य राखणे गरजेचे आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य शनिवार, १७ जानेवारी २… […]