
मुंबई,दि, ४ फेब्रुवारी २०२६ –Sunetra Pawar अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर राज्य सरकारने मोठी प्रशासकीय व राजकीय जबाबदारी सोपवली आहे. सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असून, यासंदर्भातील शासन आदेश आज अधिकृतपणे जारी करण्यात आला.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थखाते वगळता अजित पवारांकडे असलेली क्रीडा तसेच उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती सुनेत्रा पवा(Sunetra Pawar)र यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. यामुळे राज्याच्या आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये त्यांची भूमिका अधिक ठळक होणार आहे.राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी मानला जाणारा पुणे जिल्हा तसेच मराठवाड्यातील महत्त्वाचा बीड जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होते, ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत.दरम्यान, अजित पवारांकडे असलेली नियोजन व वित्त ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री यांनी स्वतःकडेच ठेवली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सत्तासंतुलन आणि प्रशासकीय नियंत्रण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

