
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ कृष्ण सप्तमी.,हेमंत ऋतू.,विश्वावसुनाम संवत्सर.,शके १९४७, संवत २०८२.,उत्तरायण.
⏰ राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे”
*भानुसप्तमी*
🌙 चंद्रनक्षत्र – स्वाती
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ
गंड योग | विष्टी करण
🔭 ग्रहस्थिती विशेष:
चंद्र केंद्र मंगळ | शुक्र केंद्र हर्षल
८ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शुक्र आणि राहू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, बुद्धिमान आणि कल्पक स्वभावाचे आहात. लोकांशी संवाद साधण्यात तुम्ही कुशल असता. तुमच्या बोलण्यात प्रभाव असून इतरांना सहज प्रभावित करता.
तुम्हाला स्वतंत्र विचार करणे आवडते. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधण्याची कला तुम्हाला अवगत आहे. कला, डिझाईन, फॅशन, मीडिया, व्यवसाय आणि जनसंपर्क क्षेत्रात तुम्ही विशेष यश मिळवू शकता.
कधी कधी तुमचा निर्णय बदलणारा स्वभाव अडचणीत आणू शकतो. मात्र योग्य मार्गदर्शन घेतल्यास जीवनात उत्तम स्थैर्य आणि प्रतिष्ठा मिळते. सामाजिक वर्तुळात तुम्हाला मान मिळतो.
मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) चंद्र केंद्र मंगळ असल्याने उत्साह वाढेल. मात्र उतावळेपणा टाळा. दुपारनंतर आर्थिक लाभ होतील. कामात यश मिळेल.
वृषभ:-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)संमिश्र दिवस आहे. खर्च वाढू शकतो. मात्र शुक्राच्या अनुकूलतेमुळे सायंकाळनंतर सुखद घटना घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन:-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) संवाद कौशल्याचा फायदा होईल. लेखन, शिक्षण, व्यापारात यश मिळेल. दुपारनंतर नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) घरगुती बाबींमध्ये लक्ष द्यावे लागेल. भावनिक निर्णय टाळा. सायंकाळनंतर मनःशांती मिळेल.
सिंह:-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र वरिष्ठांची साथ मिळेल. सन्मान वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या:-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) कामाचा वेग वाढेल. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. दुपारनंतर प्रवास लाभदायक ठरेल.
तुळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) तुमच्याच राशीत चंद्र असल्याने मन अस्थिर राहू शकते. गंड योगामुळे सकाळी महत्त्वाचे निर्णय टाळा. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल.
वृश्चिक:-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) गुप्त शत्रूंपासून सावध रहा. आर्थिक व्यवहारात दक्षता आवश्यक आहे. दुपारनंतर लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कामात मन रमेल. गुरु उपासना फलदायी ठरेल. प्रवास संभवतो.
मकर:-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) कामाचा ताण वाढेल. सरकारी कामात नियम पाळा. शब्द जपून वापरा. सायंकाळनंतर समाधान मिळेल.
कुंभ:-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. इच्छापूर्ती होईल. मान-सन्मान वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील.
मीन:-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) कार्यक्षेत्रात अधिकार वाढतील. मनासारखी संधी मिळेल. मात्र सामाजिक कामातून टीका होऊ शकते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य रविवार, ८ फेब्रुवारी … […]