आजचे राशिभविष्य सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ कृष्ण अष्टमी. काळाष्टमी.,शके १९४७, संवत २०८२.,विश्वावसुनाम संवत्सर.,शिशिर ऋतू. उत्तरायण.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – विशाखा
.चंद्र राशी – तूळ.योग – वृद्धी योग.रवी केंद्र चंद्र, चंद्र त्रिकोण गुरू.
“आज वर्ज्य दिवस आहे.”(Marathi Rashi Bhavishya)

मेष :-आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना जपून राहा. बोलण्यात संयम ठेवा. वरिष्ठ व्यक्तींशी वाद टाळलेला बरा. संध्याकाळनंतर परिस्थिती थोडी सुधारेल.
वृषभ :-भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता आहे. जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल.
मिथुन :-आज मन अस्थिर राहील. कामात लक्ष केंद्रीत करणे कठीण जाईल. अनावश्यक प्रवास टाळा. शब्द जपून वापरा. ध्यान, जप उपयुक्त ठरेल.
कर्क :-नोकरी व व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक ताण जाणवू शकतो, पण संयम ठेवल्यास मार्ग निघेल.
सिंह :-आज भाग्याची साथ मिळेल. गुरूच्या शुभ दृष्टीने प्रगतीचे योग आहेत. नवीन संधी मिळू शकतात. सामाजिक सन्मान वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल.
कन्या :-वर्ज्य दिवस असल्याने नवीन काम टाळा. आर्थिक निर्णय पुढे ढकला. अचानक खर्च संभवतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.
तुळ :-चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिकता वाढेल. रवी केंद्र असल्याने अहंकार टाळा. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे.
वृश्चिक :-मनात गूढ विचार वाढतील. अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. एकांताची गरज भासेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.
धनु :-मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-गुरू त्रिकोण शुभ फल देईल.
मकर :-कामाचा ताण वाढेल. जबाबदाऱ्या सांभाळताना थकवा जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद टाळा. संयम व शिस्त ठेवल्यास दिवस निभावेल.
कुंभ :-धर्म, अध्यात्म आणि ज्ञानवृद्धीचा दिवस आहे. गुरुजनांचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक बाजू मध्यम राहील.
मीन :-आज मिश्र फलदायी दिवस आहे. अनपेक्षित बदल संभवतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडत्या गोष्टी करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य सोमवार, ९ फेब्रुवारी… […]

Don`t copy text!