
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ कृष्ण नवमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
नक्षत्र – अनुराधा/ (सकाळी १०.५३ नंतर) ज्येष्ठ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (व्याघात योग)(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र लाभ मंगळ आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. वादाचे प्रसंग येऊ शकतात. मात्र हा शुभ योग् असल्याने तुमचा विजय होणार आहे. धाडसी पाऊले टाकाल. वाहन जपून चालवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमचा मूळ स्वभाव आक्रमक नसला तरी आज तुमचा वेगळा अवतार बघायला मिळणार आहे. काही कठोर निर्णय घ्याल. जमीन व्यवहारातून लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम मंगळाची अनुकूलता नसली तरी आज व्यवसाय वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे. जुनी येणी वसूल होतील. कोर्ट कामात यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) स्वभावात: तुम्ही शांत आणि प्रेमळ असलात तरी आज तुमचा नूर वेगळाच असणार आहे. तुमची आग्रही भूमिका असणार आहे. शत्रू पराभूत होतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नेहमी पेक्षा वेगळ्या कामासाठी आजची वेळ राखून ठेवावी लागेल. जुनी येणी आज वसूल करा. खनिज व्यवसायात लाभ होतील. जमिनीची कामे मार्गी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायत आज तुमचा दबदबा असणार आहे. तुम्ही राबवलेल्या योजना यशस्वी होतील. त्याचे कौतुक होईल. भावंड मदत करतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धनेश उच्च असल्याने आर्थिक बाजू भक्कम असणार आहे. त्याचा शुभ योग आज तुम्हाला भरपूर लाभ करून देतील. अग्नी संबंधित व्यवसायातून विशेष यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज तुमच्या राशीत चंद्र आहे. मंगळशी लाभ योग आहे नात्यातून अत्यंत चांगले अनुभव येतील. आर्थिक स्थिती भक्कम असणार आहे. तुमच्या पराक्रमाला कल्पकतेची जोड मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) ग्रहमान संमिश्र आहे. तरीही आज तुमच्या बोलण्याचा मोठा प्रभाव पडणार आहे. जुने आर्थिक हिशोब पूर्ण करून घ्या. आळस टाळून कामाला लागावे लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. वेळ दवडू नका. आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. आक्रमकता वाढेल. संधीचे सोने कराल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दशम चंद्र आज व्यवसायिक कामे पूर्ण करण्याचे संकेत देत आहे. कामाचा ताण वाढणार असला तरी तो लाभदायक आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. त्याचे श्रेय देखील मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मंगळ सध्या अनुकूल आहे. भाग्यात चंद्र आज तुमचे भाग्य उज्ज्वल असल्याचे दर्शवत आहे. सर्व प्रकारचे लाभ होतील. दैवी उपासना जरूर करा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


