क्रूझ वरील हायप्रोफाइल ड्रग्स पार्टी : शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ जण NCBच्या ताब्यात

0

मुंबई : मुंबईत क्रूझ वरील हायप्रोफाइल ड्रग्स पार्टीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सह आठ जणांना NCB ने ताब्यात घेतले आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ वर हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर NCB ने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB NCB) शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केलीहोती.ही क्रूझ शनिवारी निघून ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत येणार होती. तीन दिवस ही पार्टी चालणारहोती.तीन दिवसासाठी म्युझिकल प्रवासासाठी प्रवाशांकरता फूल पॅकेज तयार करण्यात आलं होतं. यावेळी आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलेहोते.या कारवाईत अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेशआहे.या पार्टीसाठी दिल्लीहून तीन मुली आल्या होत्या. या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. या तिघीही उद्योगपतींच्या मुली आहेत. या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकीन, २५ एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तगडी एन्ट्री फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या क्रूझवर ही पार्टी सुरू होती, ती क्रूझ कॉर्डेलिया क्रूझ कंपनीची होती. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी ६० हजारापासून ते ५ लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

माझा काहीच संबंध नाही-आर्यन खान

आर्यन खान याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसेही भरले नव्हते. आयोजकांनी माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का? या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का? आदी माहिती NCB घेत असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं.

शाहरुख खान दुबईत 

शाहरूख खान सध्या दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईत सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. शाहरुख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मालक आहे. ही स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर उभी आहे. त्यामुळेच शाहरूख सध्या दुबईत असल्याचे कळते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.