
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन कृष्ण त्रयोदशी. शके १९४७, संवत २०८२. शिशिर ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.
आज वर्ज्य दिवस आहे. काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करा.
चंद्रनक्षत्र – शततारका. आज
जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
चंद्र युती मंगळ, चंद्र युती बुध.
१७ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शनी, मंगळ आणि बुध या ग्रहांचा प्रभाव असतो. तुम्ही बुद्धिमान, कल्पक आणि संशोधक वृत्तीचे असतात. नवीन गोष्टी शोधण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची तुमची क्षमता उत्तम असते. तुमच्या विचारांमध्ये मौलिकता असते आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि स्वाभिमानी असतात. अन्याय सहन होत नाही. समाजकार्यात रस असतो. मित्रपरिवार मोठा असतो पण मोजक्या लोकांवरच तुम्ही पूर्ण विश्वास ठेवतात. विज्ञान, तंत्रज्ञान, गुढविद्या, संशोधन, ज्योतिष, तत्वज्ञान याकडे तुमचा विशेष कल असतो.
तुम्ही स्वातंत्र्यप्रिय असून इतरांच्या बंधनात राहणे तुम्हाला आवडत नाही. तुमच्या जीवनात अचानक बदल घडत राहतात. अनेकदा तुमचे निर्णय धाडसी असतात. लोकांना मदत करण्याची वृत्ती असते. तुमची बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी यामुळे तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकतात.
तुमच्या जीवनात संघर्ष असतो पण त्यामुळे तुमची जिद्द वाढते. वयाच्या ३२ नंतर भाग्योदय होतो. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. तुमच्या विचारांनी आणि कार्याने लोक प्रभावित होतात.
तुम्हाला प्रवास, वाचन, नवनवीन कल्पना, सामाजिक कार्य आणि मित्रमंडळींमध्ये वेळ घालवणे आवडते. तुमची उपस्थिती प्रभावी असते. कधी कधी तुम्ही हट्टी आणि दुराग्रही देखील असतात. स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याची तुमची सवय असते.
विवाहानंतर जीवनात स्थैर्य येते. जोडीदार बुद्धिमान आणि समजूतदार असण्याची शक्यता असते. आयुष्यात हळूहळू आर्थिक प्रगती होते.
आरोग्य: रक्तदाब, नसांशी संबंधित त्रास, थकवा, डोकेदुखी, पोटाचे विकार यांची काळजी घ्यावी.
व्यवसाय:शास्त्रज्ञ, संशोधक, इंजिनीअर, आयटी क्षेत्र, शिक्षक, ज्योतिष, सामाजिक कार्य, लेखक, राजकारण.
शुभ दिवस: मंगळवार, बुधवार, शनिवार.
शुभ रंग: निळा, हिरवा, जांभळा.
शुभ रत्न: नीलम, पन्ना, अमेथिस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा.)
आजचे राशिभविष्य
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-संमिश्र दिवस आहे. मित्रांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. प्रवासाची शक्यता आहे. कुटुंबात काही चर्चा होतील. रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र खर्चही वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-बुधाच्या प्रभावामुळे बुद्धीला चांगला वाव मिळेल. नवीन योजना आखाल. शिक्षण आणि लेखन क्षेत्रात यश मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-कामाचा ताण वाढेल. संयम ठेवावा लागेल. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. गोड बोलल्याने अनेक कामे मार्गी लागतील.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-आजचा दिवस लाभदायक आहे. आर्थिक प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. प्रवास घडू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-सरकारी कामे पूर्ण होतील. संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. कामातील मेहनतीचे फळ मिळेल.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-व्यवसायात बदल करण्याची इच्छा होईल. नवीन कल्पना सुचतील. समाजात तुमचा मान वाढेल. भिन्न लिंगी व्यक्तीकडून कौतुक मिळेल.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल. मात्र तुमच्या धाडसाने यश मिळेल. वाहन खरेदीचा विचार कराल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-धार्मिक कार्यात रस वाढेल. प्रवास होईल. भाग्याची साथ मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. मन प्रसन्न राहील.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-संमिश्र दिवस आहे. खर्च वाढेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-आज तुमच्या राशीत चंद्र असल्याने मन चंचल राहील. मंगळाच्या युतीमुळे धाडसी निर्णय घ्याल. कामात यश मिळेल. मात्र वाद टाळा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-कामाचा ताण वाढेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. संयम ठेवल्यास यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


