“नाशिक हादरलं! ‘कॅप्टन’ खरात गजाआड -५८ गुप्त व्हिडिओंनी उडवली सत्तेची झोप!”
अत्याचाराच्या आरोपासोबत VIP कनेक्शन उघड; राजकारणी, सेलिब्रिटींची नावे बाहेर येणार ? मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

नाशिक, दि. १८ मार्च २०२६ – Ashok Kharat News नाशिकमधील बहुचर्चित स्वयंघोषित ‘राजकीय ज्योतिषी’अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’याला अखेर नाशिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. अत्याचाराच्या गंभीर आरोपांसह, त्याच्या कार्यालयातून सापडलेल्या ५८ संशयित व्हिडिओंमुळे या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या व्हिडिओंमध्ये अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती आणि नामांकित महिलांचा समावेश असल्याचा दावा पोलिस सूत्रांकडून केला जात आहे.
“जुन्या सेक्स रॅकेटचा धागा पुन्हा जिवंत? नाशिकमध्ये नव्या प्रकरणामुळे संशय वाढला!”(Ashok Kharat News)
काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटचा मोठा भांडाफोड झाला होता. त्या वेळी अनेक धक्कादायक तपशील समोर आले, मात्र काही दिवसांनंतर हे प्रकरण अचानक शांत झाल्याचे दिसून आले. आता ‘कॅप्टन’ खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा त्या जुन्या घटनेची चर्चा रंगू लागली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात असून, पोलिस तपासातून याचे उत्तर समोर येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय? (Ashok Kharat News)
नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, महिलेवर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हे शाखा युनिट-1 कडून तपास सुरू करण्यात आला.मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत खरातला ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे तीन वाजता त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयावर छापा
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील अशोक खरातच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांच्या हाती एक पेनड्राईव्ह लागला, ज्यामध्ये 58 व्हिडिओ आढळले. या व्हिडिओंमध्ये उच्चभ्रू समाजातील व्यक्तींचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या व्हिडिओंचा (Ashok Kharat Videos Leak) नेमका स्वरूप काय आहे, ते ब्लॅकमेलिंगसाठी वापरले गेले होते का, किंवा यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहे ‘कॅप्टन’ अशोक खरात?
अशोक खरात हा मूळ सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील रहिवासी असून, तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांत त्याने स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि ‘अंकशास्त्रज्ञ’ म्हणून स्थापित केले होते.त्याने अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. भविष्यासंबंधी मार्गदर्शन, राजकीय सल्ले आणि वैयक्तिक समस्यांचे निराकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक त्याच्याकडे येत असत.
राजकीय कनेक्शनमुळे वाढलेली चर्चा
या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलेली बाब म्हणजे अशोक खरातचे राजकीय वर्तुळातील संबंध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.विशेषतः रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामध्ये त्या त्याच्या पाद्यपूजा करताना दिसत आहेत. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सामाजिक संताप आणि प्रश्नचिन्हे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एका भोंदूबाबाशी जवळीक ठेवणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या पदावरील व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याची टीका होत आहे.
मंदिर ट्रस्ट आणि संस्थात्मक जाळे
अशोक खरात हा श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून, सिन्नर तालुक्यात त्याने ‘श्री शिवनिका संस्थान’ नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या विश्वस्त मंडळातही काही प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगितले जाते.या संस्थांच्या माध्यमातून त्याने समाजात आपले प्रभावी जाळे निर्माण केले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी
या प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातची सखोल चौकशी व्हावी, तसेच त्याच्या माध्यमातून किती लोकांची फसवणूक झाली आहे, हे उघड करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
RTI कार्यकर्त्याचा मोठा दावा
RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाला मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा दावा केला आहे.त्यांच्या मते, अशोक खरातची अटक ही केवळ एक गुन्हा नसून, वर्षानुवर्षे चालत आलेल्या शोषणाच्या साखळीचा पर्दाफाश आहे.त्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की:
खरातला संरक्षण कोण देत होते?
त्या 58 व्हिडिओंमध्ये नेमके कोण आहेत? राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा इतकी काळ मूक का होती?
“महाराष्ट्राची एपस्टीन फाईल” – राजकीय टोलेबाजी
या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. काही नेत्यांनी याची तुलना “एपस्टीन केस”शी करत “महाराष्ट्राची एपस्टीन फाईल” असा उल्लेख केला आहे.यामुळे या प्रकरणाला केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकीय आयामही प्राप्त झाले आहेत.
पोलिसांचा तपास – पुढे काय?
नाशिक गुन्हे शाखेकडून सध्या पुढील बाबींचा तपास सुरू आहे: पेनड्राईव्हमधील 58 व्हिडिओंचे फॉरेन्सिक विश्लेषण
संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे
ब्लॅकमेलिंग किंवा आर्थिक व्यवहारांचा तपास
इतर पीडित महिलांची शक्यता
सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल यांनी सांगितले की, “सध्या एकाच महिलेची तक्रार आहे, मात्र तपासाच्या दरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.”
समाजासाठी धोक्याचा इशारा?
या प्रकरणाने एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आणला आहे — समाजात अजूनही भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेला किती मोठ्या प्रमाणावर खतपाणी मिळत आहे?अशोक खरातसारखे लोक ‘ज्योतिष’, ‘ऊर्जा’, ‘कॉस्मॉलॉजी’ यांसारख्या संज्ञांचा वापर करून प्रभावशाली लोकांपर्यंत पोहोच निर्माण करतात आणि विश्वास संपादन करतात. त्यानंतर त्या विश्वासाचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते.
अशोक खरात प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, सत्तेचे नाते, आणि विश्वासाच्या गैरवापराचा एक मोठा धडा आहे.आता सर्वांच्या नजरा पोलिस तपासावर लागल्या आहेत. या प्रकरणातून आणखी किती धक्कादायक खुलासे समोर येणार, आणि किती प्रभावशाली लोकांचे नाव उघड होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


[…] […]