आजचे राशिभविष्य शुक्रवार,२० मार्च २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र शुक्ल द्वितीया. पराभवनाम संवत्सर.शके १९४८,संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज शुभ दिवस आहे. *बालचंद्रमा व्रत*
चंद्रनक्षत्र – रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी शुभ तर गुरुशी केंद्र योग् आहे. तुमच्या व्यय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील आणि स्वतःच्या आनंदासाठी खर्च देखील कराल. महिलांकडून लाभ मिळतील. नात्यात काही गैरसमज संभवतात.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लाभ स्थानी चंद्र आहे. लक्ष्मीची कृपा राहील. भौतिक सुखे प्राप्त होतील. धर्म कार्यात सहभागी व्हाल. भाग्योदय होईल. कलाकारांना अनपेक्षित यश मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दशम चंद्र आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दूरचे प्रवास घडतील. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नवम चंद्र- शुक्र आहे. संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज घेऊ शकतात. सहल घडेल. नवीन मित्र मैत्रिणी मिळतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) असत स्थानी चंद्र आहे. सोबत शुक्र आहे. सासुरवाडी कडून लाभ मिळतील. खर्चात वाढ होईल. अनुकूल गुरू शुभ लाभ मिळवून देतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. शुभ समाचार समजतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी बढती चे योग आहेत.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसाय वाढीसाठी उत्तम ग्रहमान आहे. आज तुमचा व्यस्त दिवस असणार आहे. तरीही वेळात वेळ काढून कुलदेवतेचे दर्शन घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्या तडक फडके स्वभावाला साजेसा दिवस आहे. कामे पूर्ण होतील. प्रेमात यश मिळेल. चांगली बातमी समजेल. मात्र गुरुचे बळ नाहीये.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवीन घर खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. वाहन सौख्य लाभेल. छोटी सहल घडेल. घराची रंगरंगोटी आणि दुरुस्ती कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अर्थपूर्ण दिवस आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. नात्यातून मदत मिळेल. अडचणी दूर होतील मात्र आज कष्ट अधिक करावे लागणार आहेत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या बोलण्यावर आज बरेच काही अवलंबून आहे. रुचकर मेजवानी मिळेल. कामे मार्गी लागतील. भाग्य उजळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आणि शुक्र आहेत. शुक्र उच्च आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. वास्तू बाबत काही अडथळे येऊ शकतात.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!