नाशिकमध्ये शनिवार दि २१ मार्च रोजी रंगणार समिज्ञा हिरकणी पुरस्कार सोहळा

महाराष्ट्रभरातील २१ कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

0

नाशिक,दि २० मार्च २०२६ – Cultural Events in Nashik समिज्ञा फाऊंडेशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा समिज्ञा हिरकणी पुरस्कार यंदा उत्साहात आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने यंदा महाराष्ट्र भरातून २१ महिलांना आणि एक गुणवंत पुरस्कारार्थीला सन्मानित करण्यात येणार असून, या पुरस्काराचे हे ८ वे  वर्ष आहे.समिज्ञा फाऊंडेशन गेल्या 12 वर्षांपासून महिला आणि बालविकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. तळागाळातील, उच्चशिक्षित, कर्तृत्ववान आणि आपल्या कार्यातून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. विशेष म्हणजे, लहान वयातच प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या गुणवंतालाही दरवर्षी गौरविण्यात येते आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास नाशिकचे उपमहापौर श्री. विलास शिंदे, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राज नगरकर आणि शिक्षणतज्ज्ञ श्री. सचिन जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 21 मार्च 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता नाशिकमधील श्री हॉल, ए. सी. जी मानवता हॉस्पिटल, मुंबई आग्रा हायवे, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

संस्थेच्या अध्यक्षा समीर तोरस्कर आणि संस्थापिका प्रज्ञा भोसले तोरस्कर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणे, त्यांना व्यासपीठ देणे आणि इतर महिलांसाठी प्रेरणास्रोत निर्माण करणे, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारार्थींची यादी :(Cultural Events in Nashik)
शालिनी नारखेडे, पुणे
शशिकला कोल्हे, पुणे
हिमा चोधरी, जळगाव
डॉ. सुषमा दुगड
कीर्ती भवळकर
शुभांगी पाटील
हिमिका शाह
रुचिता ठाकूर
डॉ. मीनल कोतकर
दिपाली ओझरकर
सुनीता साबळे
सीमा पवार
रितू मुथा
मनीषा काकड, मुंबई
प्रीती मेहता
सोनल इचाळे
पूनम देशमुख
स्नेहल शेवाळे
सारिका कड, खेड
रुपाली रोवडकर
संगीता कुलकर्णी, पुणे

गुणवंत पुरस्कार
श्रावणी पांढरे

समिज्ञा फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांना पुढे आणण्याचे आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!