
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२ चंद्र – वृषभ राशीत नक्षत्र – रोहिणी / (संध्याकाळी ७.०५ नंतर) मृग नक्षत्र प्रारंभ
चैत्र शुक्ल षष्ठी पराभव
मंगलवार – भगवान हनुमान व मंगळ ग्रह उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस
राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
दिशाशूल – उत्तर दिशा
शुभ रंग – लाल, पांढरा, गुलाबी
शुभ अंक – ६, ९
२४ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही मोहक, आकर्षक, कलाप्रिय आहात. तुम्हाला एकांतवास प्रिय असतो. समाजात तुमच्या बऱ्याच ओळखी असतात. नातेवाईक आणि मात्र मंडळी यांचेकडे तुमचा जाणे येणे असते. तुमचा उच्च व्यक्तींवर प्रभाव पडतो आणि तुम्हाला त्यांची चांगली मदत मिळते. भिन्न लिंगी व्यक्तींकडून तुम्हाला फायदा होतो मात्र तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला शेअर्स यासारख्या बे भरवशाचा व्यवसायातून चांगले लाभ होतात. विवाह झाल्यावर तुमचा भाग्योदय होतो. सामाजिक जीवन तुम्ही कौटुंबिक जीवनापासून दूर ठेवतात. तुम्ही प्रेमळ, दयाळू आणि भावनाशील आहात. मात्र भावना दाबून ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. विश्वासू व्यक्तीकडे तुम्ही मोकळेपणाने व्यक्त झाले पाहिजेत. तसे तुम्ही जबाबदारीने वागतात. तुम्ही शीघ्रकोपी आहेत आणि तुमचा राग शांत होत नाही. तुम्हाला स्वतःला कोणत्याही विषयाचा अभ्यास करणे आवडते. तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकतात.
व्यवसाय:- समाजकारण, नेते, सचिव, राजदूत, परराष्ट्र, बँकिंग, जाहिरात, अभिनेता.
शुभ रंग – गुलाबी.
आज चांगला दिवस आहे.चंद्र केंद्र मंगळ, चंद्र लाभ शुक्र.
मेष (Aries)-आज कार्यक्षमता वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस. आर्थिक लाभ संभवतो. उपाय: हनुमान चालिसा पठण करा व गूळ अर्पण करा
वृषभ (Taurus)-चंद्र तुमच्या राशीत आहे. मन आनंदी राहील. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सुख मिळेल. उपाय: लक्ष्मी मातेला पांढरी फुले अर्पण करा।
मिथुन (Gemini)-मन थोडे अस्थिर राहू शकते. खर्च वाढण्याची शक्यता. संयमाने वागा. उपाय: विष्णू मंदिरात दीपदान करा।
कर्क (Cancer)- मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील. उपाय: शिवलिंगावर जल अर्पण करा।
सिंह (Leo)-कार्यक्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. प्रतिष्ठा वाढेल. उपाय: सूर्याला अर्घ्य द्या व आदित्य हृदय स्तोत्र पठण करा.
कन्या (Virgo)-भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग. धार्मिक कार्यात रुची वाढेल. उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.
तुळ (Libra)-संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल संभवतात. उपाय: महालक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)-संबंध दृढ होतील. जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती. उपाय: हनुमानाला सिंदूर व तेल अर्पण करा.
धनु (Sagittarius)-कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य सुधारेल. उपाय: केशर तिलक लावा व विष्णू पूजन करा.
मकर (Capricorn)-घरगुती वातावरण आनंदी राहील. मुलांकडून सुख मिळेल. सर्जनशीलता वाढेल. उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.
कुंभ (Aquarius)-घरातील कामे पूर्ण होतील. मालमत्तेसंबंधी निर्णय घ्याल. आई-वडिलांची साथ मिळेल. उपाय: हनुमानाला लाल फुल अर्पण करा.
मीन (Pisces)- संवादातून लाभ होईल. लहान प्रवास संभवतो. आत्मविश्वास वाढेल. उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा।
आजचा शुभ विचार:“योग्य वेळेची वाट पाहू नका — प्रत्येक क्षण योग्य बनवण्याची ताकद तुमच्यात आहे.”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


