आजचे राशिभविष्य शुक्रवार, २७ मार्च २०२६

२७ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Today’s Rashi Bhavishya Marathi)
चैत्र शुक्ल नवमी/दशमी   पराभवनाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२  
चंद्र – मिथुन / (सकाळी ९.३६ नंतर) कर्क राशीत  
नक्षत्र – पुनर्वसु / (दुपारी ३.२४ नंतर) पुष्य
राहुकाळ – सकाळी १०.३० ते १२.००
दिशाशूल – पश्चिम दिशा
शुभ रंग – पांढरा, गुलाबी, क्रीम
आज उत्तम दिवस आहे.  अतिगंड योगचंद्र केंद्र शुक्र, चंद्र त्रिकोण शनी, चंद्र लाभ हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून

२७ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Today’s Rashi Bhavishya Marathi)
तुमच्यावर मंगळ आणि गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्यात धार्मीकपणा, पुढारीपण, निसर्गप्रेमी आढळते. दांडगा आत्मविश्वास हे तुमचे बलस्थान आहे मात्र तुमच्या व्यक्तिमत्वात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला लहान मुले, निसर्ग आणि प्राणी प्रिय असतात. दुर्बल लोकांना मदत करण्यात तुम्हाला विलक्षण समाधान लाभते. तुम्हाला भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण असले तरी तुम्ही सावध राहिले पाहिजे. तुम्हाला प्रतिष्ठा, मान अपमान याबाबत संवेदनशीलता असली तरी तुम्ही त्यावरून चटकन अस्वस्थ होतात. साधारणपणे सोसायटीत किंवा शेजाऱ्यांशी तुमचे जमत नाही. तुम्हाला न्यायाची चाड असते. तुमि दानशूर आहात आणि न्यायिअसाठी झगडतात.

तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. इतरांच्यापेक्षा तुम्हाला अधिक पैसे मिळतो. प्रिय व्यक्तीसाठी खर्च करताना तुम्ही कंजूषपणा करत नाहीत. तुम्ही मैत्रीला जागणारे आहात. स्वतःशी प्रामाणिक असतात. तुम्ही सभ्य आहात आणि तुमचे मन विशाल आहे. तुमच्यात अफाट इच्छाशक्ती आहे. तृम्हाला चांगले आरोग्य लाभते. तुम्ही करारी स्वभावाचे आहात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा कलेचा वारसा मिळतो. तुम्हाला चांगल्या स्मरणशक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे वरदान आहे. भूतकाळातील घटना तुम्हाला स्पष्टपणे आठवतात. तुम्ही गुप्तशत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. कोर्ट कामात तुम्हाला सहसा अपयश येऊ शकते. खोटे आरोप करण्याऱ्या लोकांपासून सावध रहा. वैवाहिक जीवनाचा दबाव आयुष्यात येऊ शकतो. तुम्ही लढाऊ, आक्रमक, धाडसी, तत्पर आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. कितीही विरोधी परिस्थिती असली तरी तुम्ही त्यास तोंड देऊ शकतात.

तुम्हाला पराभव माहिती नाही. नेपोलियन चा या शास्त्रावर विश्वास होता त्यामुळे त्याने तुमच्यासारख्या मंगळाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्ती सैन्यात घेतल्या होत्या. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यात नाजूकपणा नसतो. मात्र तुमचा हेतू चांगला असतो. तुम्ही तापट असतात आणि सहसा कळवळा येत नाही. नवीन योजनेत जाण्यास तुम्ही उतावीळ असतात. तुमच्या चुका तुम्ही मान्य करत नाहीत. खेळ आणि शक्तिशाली व्यायाम यांची तुम्हाला आवड असते. दुरबल लोमना मदत करणयात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि त्यात नैतिकता असते. तुम्हाला मुले आणि प्राणी प्रिय असतात. मित्रांच्या पाठीशी तुम्ही उभे राहतात. तुम्ही कायद्याचे पालन करतात. गूढ गोष्टींचे आकर्षण असते. जबाबदारीच्या जागा तुम्ही सांभाळू शकतात. महत्वाकांक्षा, पुढारीपण, मान मरातब, निसगप्रेम, धार्मिक वृत्ती, विचारवंत, अभ्यासू, प्रवासाची आवड, विशाल दृष्टीकोन हे तुमचे गुण आहेत. तुमच्या आवडी निवडी बद्दल ठाम असतात. इतरांवर टीका करणे,  अहंकार, कठोर बोलणे टाळावे.
व्यवसाय:– लेखन, वक्ते,धर्मगुरू, शिक्षक, पुढारी, इंजिनीअर, खाणकाम, लोखंड, बांधकाम.
शुभ रंग – पांढरा, तांबडा, पिवळा.
शुभ दिवस:– सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ अंक – ६, २, ७
शुभ रत्ने:- पुष्कराज, मोती, माणिक.

मेष (Aries)-कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे संकेत. जोडीदाराशी संबंध अधिक दृढ होतील.
उपाय: देवी लक्ष्मीला खीर व कमळफूल अर्पण करा.
वृषभ (Taurus)-शुक्राचा प्रभाव अनुकूल आहे. प्रतिष्ठा वाढेल. नवीन संधी मिळतील.
उपाय: पांढरे वस्त्र धारण करा व सुगंध वापरा.
मिथुन (Gemini)-सकाळचा वेळ लाभदायक. निर्णय योग्य ठरतील. दुपारनंतर भावनिकता वाढेल.
उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.
कर्क (Cancer)-सकाळी चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक आनंद वाढेल.
उपाय: चंद्राला तांदूळ व दूध अर्पण करा.
सिंह (Leo)-कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ संभवतो.
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या व लक्ष्मी पूजन करा.
कन्या (Virgo)-आर्थिक लाभाचे योग. मित्रांकडून मदत मिळेल. कार्यात स्थैर्य येईल.
उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.
तुळ (Libra)-शुक्र कृपेने दिवस अत्यंत शुभ. प्रेमसंबंध दृढ होतील. कला क्षेत्रात प्रगती.
उपाय: देवी लक्ष्मीला गुलाबपुष्प अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)-धनप्राप्तीचे योग. व्यवसायात प्रगती. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा.
धनु (Sagittarius)-भाग्याची साथ मिळेल. प्रवास लाभदायक. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस.
उपाय: विष्णूला पिवळे फुल अर्पण करा.
मकर (Capricorn)-नोकरीत प्रगती. आर्थिक स्थैर्य येईल. आरोग्य सुधारेल.
उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.
कुंभ (Aquarius)-नवीन करार व व्यवहारासाठी शुभ वेळ. कुटुंबात आनंद. मानसिक शांती.
उपाय: तुलसीला प्रदक्षिणा घाला.
मीन (Pisces)-धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रेमजीवन सुखकर. आर्थिक लाभ संभवतो.
उपाय: विष्णूला खीर अर्पण करा व लक्ष्मीचे नामस्मरण करा.

 आजचा शुभ विचार:

“समाधान आणि श्रद्धा यांचा संगम झाला, तर जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते.”

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!